बकासूर गँग तडीपार : टोळीप्रमुखासह 16 जणांवर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बकासूर गँगवर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. टोळीप्रमुख यश जांभळेसह 16 जणांचा यामध्ये समावेश आहे. हप्ता देत नसल्याच्या कारणातून या टोळीने भरदिवसा अल्पवयीन मुलावर हल्ला केला होता.

यश नरेश जांभळे (वय-20, रा. झेडपी कॉलनी, शाहुपूरी), राहुल संपत बर्गे, टेट्या ऊर्फ गौरव अशोक भिसे, ऋशिकेश ऊर्फ शुभम हणमंत साठे, अनिकेत उदय माने, आदित्य सुधीर जाधव, शंतनू राजेंद्र पवार, अनिकेत सुभाष पारशी, पिन्या ऊर्फ सुनिल माणिकराव शिरतोडे, एक अनोळखी व 7 विधी संघर्षग्रस्त बालक यांचा यामध्ये समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी प्रतापगंज पेठ, सातारा येथे रोडवरच बकासूर गँगने धुडगूस घातला होता. हप्ता देत नसल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या सर्व घटनेने सातारा हादरुन गेला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये टोळी प्रमुख यश जांभळे याने त्याच्या टोळी सोबत दहशत माजवण्यासाठी सातारा शहरातील इतर गुन्हेगार साथीदार हाताशी धरल्याचे समोर आले.