हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आर्थिक क्षेत्रात डिजिटलायझेशन झालेले आहे. त्यामुळे आपल्याला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे म्हटले, तरी बँकेत जायची गरज पडत नाही. परंतु काही कामे अशी असतात त्यासाठी बँकेत जावे लागते. तुम्हाला देखील सातत्याने बँकेत जावे लागत असेल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण आता बँकेच्या वेळा बदलणार आहेत. बँक चालू होण्याची आणि बंद होण्याची वेळ वेगवेगळी असू शकते. अशातच बँकेच्या सुविधा सुधारण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता मध्य प्रदेशातील सर्व राष्ट्रीयकृत बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ सारखीच असणार आहे.
बँकेबाबत हा नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. त्यामुळे अत सर्व बँक या सकाळी 10 वाजता चालू होती आणि दुपारी 4 वाजता बंद होतील. राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आलेल. या निर्णयामुळे बँकिंग सेवा चांगल्या पद्धतीने पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या वेगवेगळ्या बँकांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा खूप गोंधळ होतो. काही बँका या सकाळी 10 वाजता चालू होत्या. काही बँका 10: 30 तर काही बँका 11 वाजता उघडतात. ज्या लोकांची दोन वेगवेगळ्या बँकेत खाती आहेत, त्यांच्यासाठी अडचण निर्माण होते. आणि यासाठीच आता सगळ्या राजकीय बँकांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. सगळ्यांचे वेळापत्रक समान असल्याने आता नागरिकांची देखील होणार नाही.
सर्व बँका एकाच वेळी काम करत असल्याने आता आंतर बँक व्यवहारांनी ग्राहक संदर्भ या सेवांमध्ये चांगले समन्वय राहील. तसेच कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. ऑफिसच्या शिफ्टचे नियोजन देखील चांगल्या पद्धतीने होईल.