आमदार हरिभाऊ बागडे यांनी उभारले बाल कोविड सेंटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांनी बालकांसाठी मोफत विलगीकरण केंद्र उभारले आहे. 50 बेडची क्षमता या केंद्राची असल्याचे आमदार बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सिडको एन-5 येथील धर्मवीर संभाजी विद्यालय पंडित दीनदयाल यांच्या नावाने बालकांसाठी आयसोलेशन केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सिडको व परिसरात धर्मवीर संभाजी विद्यालयाचे सुमारे दीड हजार विद्यार्थी राहतात. इतर शाळेचे हे अनेक विद्यार्थी आहेत. कोणी बालक बाधित झाले व त्यास आई सोल्युशन ची गरज भासल्यास त्यास व त्यांच्या परिवारास अडचण येऊ नये यासाठी हे सुसज्ज असे सेंटर उभारण्यात आल्याचे आमदार बागडे यांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा स्टाप आवश्यक औषधे व ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना पिण्याचे पाणी, चहा, नास्ता व जेवणाची सुविधा पूर्णपणे मोफत पुरविण्यात येणार आहे. सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबरोबरच त्यांच्यासाठी संगणक लॅबही उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती आमदार बागडे यांनी दिली.