हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता बाळा नांदगावकर हे देखील मनसे सोडणार असल्याचा एक व्हायरल मेसेज सोशल मीडियावर सुरू झाला. त्यानंतर खुद्द बाळा नांदगावकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देत या गोष्टीचे खंडन केलं आहे.
मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडिया च्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस माहीतच आहे. मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील.
https://www.facebook.com/MeBalaNandgaonkar/photos/a.140333606021996/4580264828695496/?type=3
त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही. कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही व जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही. एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते. “तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम” असे बाळा नांदगावकर यांनी म्हंटल.