दिल्ली | SFI च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी व्ही.पी.सानू (केरळ) यांची तर राष्ट्रीय महासचिवपदी मयुख बिश्वास (पश्चिम बंगाल) यांची फेरनिवड करण्यात आली अाहे. तसेच महाराष्ट्रातून बालाजी कलेटवाड यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
SFI च्या केंद्रीय कमिटीवर महाराष्ट्रामधून सदस्य म्हणून सुनील राठोड, सोमनाथ निर्मळ, रोहिदास जाधव आणि कविता वरे यांची निवड झाली आहे.
शिमला येथे (३० आक्टो ते २ नोव्हें) होत असलेल्या SFI च्या १६ व्या अखिल भारतीय अधिवेशनाने एकूण ९३ सदस्यांची नवीन केंद्रीय कार्यकारी कमिटीची निवड केली आहे.