कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, त्यांचे चिरंजीव यशराज देसाई यांच्यासह 17 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच निवडणूक बिनविरोध झाली असली तरी याची औपचारिक घोषणा 12 जुलै रोजी होणार आहे.
दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. कारखान्याच्या 17 जागांसाठी निवडणूक होत असून या 28 इच्छुक उमेदवारांनी 30 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. माजी मंत्री शंभूराज देसाई, यशराज देसाई, अशोकराव पाटील, सोमनाथ खामकर, शंकर शेजवळ, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, सर्जेराव जाधव, पांडुरंग नलावडे, विष्णू पवार, प्रशांत राजाराम पाटील, विश्वास पाटील, राजाराम पाटील, सुनील पानसकर, बळीराम साळुंखे, दिपाली पाटील, विश्रांती देशमुख, रंजना पाटील, जयश्री कवर, दिपाली निकम, विजय सरगडे, बबन भिसे, शंकरराव पाटील, पांडुरंग शिरवाडकर, युवराज गिरी, भागोजी शेळके, डॉ. दिलीपराव चव्हाण, ड. मारुती नांगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
या 30 उमेदवारांपैकी पहिल्या दोन दिवसात 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मात्र असे असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख जुलै असून त्यानंतरच निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले जाणार आहे.