विशेष प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्याच्या या जयंतीनिमित्त कराड (Karad) शहरातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद (Nitin Kashid) यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रात्री अडीच वाजता कराड शहरात आल्याची आठवण, यावेळी त्यांनी सांगितली आहे. शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात असताना, त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे अन् त्यांचे सुपुत्र उध्दव ठाकरेंचीच असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा कराडशी ऋणानुबंध: नितीन काशिद pic.twitter.com/WVX93z0W6t
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) January 23, 2023
नितीन काशिद म्हणाले, सन 1983- 84 ला कराड शहरात शिवसेनेची शाखा स्थापन करण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची दखल घेवून त्यांनी शिवसेना शाखा काढण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर शाखेचे काम कसे असावे, हेही त्यांनी ते विषद केले. अत्यंत आपुलकीचे पत्र आजही मी जपून ठेवले आहे. त्यानंतर 1989 साली कराड शहरात यशवंतराव मोहिते यांच्या पुढाकारातून चाैफेर प्रतिष्ठानतर्फे परिसंवाद आयोजित केला होता. तेव्हा स्व. बाळासाहेब हे शासकीय विश्रामगृहात आले होते. तेव्हा पदाधिकाऱ्यांना जवळ बोलावून आपुलकीने, मायेने शाबासकीची थाप मारली. 1990 साली चंद्रकांत पवार यांच्या प्रचार्थासाठी रात्री अडीच वाजता छ. शिवाजी स्टेडियमवर आले होते.
‘फटकारे 2023’ ही चित्रकला स्पर्धा
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा शास्त्रीनगर व शहीद भगतसिंग मंडळ कराड यांच्या वतीने आयोजित केलेल्या फटकारे 2023 ही चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात आ. पी. डी. पाटील उद्यानात पार पडली.
स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद पाटील यांच्या हस्ते आदरणीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचे व फटकारे या व्यंगचित्र संग्रहाचे पूजन करून करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख शशिकांत हापसे, दिलीप यादव, नरेंद्र लोहार,मारुती कांबळे,शहाजी जाधव, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.