पुणे | स्वप्निल हिंगे
सांस्कृतिक राजधानी म्हणुन ओळख असलेल्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. नाटक, कला इत्यादी चा वारसा लाभलेल्या पुण्यामधे बालगंधर्व रंगमंदिराला विशेष ओळख आहे.
बालगंधर्वची एतिहासिक वास्तू पाडून तेथे नवीन इमारत उभी करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजत आहे. नव्या इमारतीची प्रतिकृती कशी असावी यासाठी काही वास्तुविशारदांकडून आराखडे मागवण्यात आले आहेत. शहराचं वैशिष्ट्य असलेली ही वास्तू पाडावी की नाही यावर अनेक मतभेद सुरू होते. मात्र हे करताना बालगंधर्व पाडण्यात येणार नाही असं ही महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितल.
५० वर्षे जुनी असूनही ही वास्तू पुण्याचा आजही अभिमान आहे. बालगंधर्व रंगमंदीर चे ८ ऑक्टोबर १९६२ ला बालगंधर्वाच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच उदघाटन २६ जून 1968 रोजी गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.