कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
ऊसाची एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दराच्या मागणीसाठी आज बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र या गावापासून ते राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत संघर्ष यात्रा काढण्यात आली. यावेळी शकारमंत्र्याना आपल्या पदाचा व गोपनीयतेच्या घेतलेल्या शपथेचा विसर पडल्याचा हल्लाबोल बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बि जी काका पाटील यांनी केला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आज ऊसाची एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दराच्या मागणीसाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात ऊस दराबाबत एकही आंदोलन झालेले नाही. याचा फायदा राज्यातील सर्व सहकारी साखर कारखानदारांनी घेतलेला आहे. यावर्षी साखरेला चांगला भाव मिळालेला आहे. तरीही राज्यातील एकही कारखानदार ऊसाच्या एफआरपीची दर वाढवायला तयार नाहीत. म्हणून आम्ही याविरोधात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र या गावातून आमच्या संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांना एकच सांगणे आहे कि आपले भविष्य उज्वल आहे. साखरेला अधिक चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे आता बळीराजा शेतकरी संघटनेने मागणी केली आहे कि एकरकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये अशे ऊसाला प्रतिटन 3600 रुपये रक्कम मिळणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस घालण्याची घाई करू नये, असे पाटील म्हणाले.