रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे बळीराजा संघटनेचे गुरूवारी आंदोलन : साजिद मुल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गुहागर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम चालू आहे. कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात निकृष्ठ दर्जाचे काम केले जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवारं सांगितले जावूनही केवळ टक्केवारीने बरबटलेले अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करित आहेत. तेव्हा कामाचा दर्जा न सुधारल्यास कराड- विटा रोडवर बळीराजा शेतकरी संघटना 17 फेब्रुवारीला आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, गुहागर ते विजापूर या राष्ट्रीय मार्गावर काम सध्या चालू आहे. एक लाईनचे काम पुर्ण झाले, त्यातही निकृष्ठ दर्जाचे माती मिश्रित मुरुम रस्ता खुदाई करुन त्यातून निघणारे निकृष्ठ दर्जाचे मटेरियल संबंधित ठेकेदाराने वापरले आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. दुसऱ्या लेनचे कामही सुरू आहे. साधारण एक मीटरची खुदाई करुन त्यात चांगल्या पध्दतीचा मुरुम- खडीचा वापर करणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदार त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खुदाई करुन त्यातून निघणारे निकृष्ठ दर्जाचे माती मिश्रीत मुरूम वापरून रस्त्याचे काम चालू आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी यांचे हात टक्केवारीने बरबटलेले आहेत. त्यामुळे ते अधिकारी कर्मचारी हे मूग गिळून गप्प आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ रस्त्याची पाहणी करून चांगल्या पध्दतीचा मुरुम, खडी वापरण्यास संबंधित ठेकेदार कंपनी यांना सांगावे. गोवारे गावच्या हद्दीमध्ये ही निकृष्ठ दर्जाचे मटेरियल वापरण्यात येत आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा अधिकारी यांना काळे फासणार असल्याचा इशारा गोवारे गावच्या ग्रामपंचायत सदस्या शबाना साजिद मुल्ला यांनी दिला आहे.

Leave a Comment