व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

टॅक्स जमा करताना कधीही करू नका ‘या’ चुका; अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली । टॅक्स जमा करणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा विषय आहे. टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करणे, वेळेवर कर भरणे किंवा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे असो. अनेकवेळा लोकं टॅक्स जमा करताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे भविष्यात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. येथे आम्ही तुम्हांला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत…

जर करदात्याने वेळेवर टॅक्स जमा केला नाही, तर त्या व्यक्तीला जमा केलेल्या संपूर्ण थकबाकीवर व्याज द्यावे लागते. जर टॅक्सची रक्कम जास्त असेल तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे, जर ITR पेमेन्टच्या तारखेच्या आत भरला नाही, तर करदात्याला लेट फीस भरावी लागेल. याशिवाय जमा झालेल्या टॅक्स वर जास्त व्याज द्यावे लागते. बहुतेक लोकं मूल्यांकन वर्षाच्या शेवटी टॅक्स भरतात. अशा परिस्थितीत ITR भरताना काही चूक झाली तर करदात्याला ती सुधारण्याची संधी मिळत नाही. त्याचा मोठा फटका करदात्याला सहन करावा लागतो.

बहुतेक लोकं आपली टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट जमा करण्यासाठी आर्थिक वर्ष संपेपर्यंत वाट पाहतात. त्यानंतर, ते घाईघाईने योग्य गुंतवणूक साधन निवडण्यात चूक करतात किंवा अंतिम मुदत चुकवल्यास जास्त टॅक्स भरावा लागतो. टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट ही साधारणपणे दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने, दीर्घकालीन वचनबद्धता करण्यापूर्वी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

ट्रेड स्मार्टचे सीईओ विकास सिंघानिया म्हणाले की,”बहुतेक लोकं त्यांच्यासमोर असलेली पहिली टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट निवडतात किंवा कोणत्याही कर नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. काही लोकांना असे वाटते की, थोड्या प्रमाणात कर वाचवणे आणि मोठे भांडवल रोखणे ही चांगली कल्पना नाही. तर अशा छोट्या बचतीतून लोकं भविष्यात खूप मोठी बचत करू शकतात.”

सिंघानिया म्हणाले की,”वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांत कर नियोजनात उशीर, कमी रिटर्न देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करणे, जादा नियोजन करणे आणि सूट आणि कपातीचा पुरेपूर फायदा न घेणे या सामान्य चुकांमध्ये समावेश होतो. या चुका बहुतेक लोकं करतात.”