शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही ; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

0
65
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । कराड प्रतिनिधी

कराड:-खबरदार थकित विज बिलाचे कारण सांगून शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन कट कराल तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही,असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे.

साजिद मुल्ला म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. याचे भान महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाहिजे. लाकडाऊनच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले. परंतु एकच उद्योग चालू होता, तो म्हणजे शेती लाकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेला अन्नपुरवठा करण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. उद्योगधंदे वाल्यांची वीज बिले माप सरकार करत आहे. त्यांना वेगवेगळ्या सवलती देते. मात्र शेतकऱ्यांना सवलती देताना सरकार नियम आणि निकष लावत आहे.

शेती पंपाच्या विज बिला बाबतीत आज शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. वास्तविक सरकारने शेती पंपाची वीज बिले सरसकट माफ करावी. शेती पंपाच्या बिलामध्ये अनेक त्रुटी आहेत. मीटरची रिडींग न घेता, शेती पंपाची वीज बिले शेतकऱ्यांना आले आहेत. त्यात कोणतीच नियमितता दिसून येत नाही. शेती पंपाच्या वीज बिला वरती सरळ सरळ मीटरचे रीडिंग उपलब्ध नाही, असे लिहिले आहेत. मग शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे, तुम्ही वीजबिले कोणत्या आधारावर दिली आहेत.

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कडून शेतीपंपाची सक्तीची वीजबिल वसुली चालू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. चुकीच्या पद्धतीने शेती पंपाची वीज बिले आली आहेत, या अन्यायाविरोधात बळीराजा शेतकरी संघटना महावितरणच्या विरोधात कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे. सातारा जिल्ह्यातील सक्तीची शेती पंपाची वीज बिले वसुली चालू आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडायचा प्रयत्न करणार्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here