Bamboo Plantation Scheme | बांबू लागवडीसाठी सरकार देणार 50 % अनुदान, योजनेसाठी असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bamboo Plantation Scheme आजकाल बांबूची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. सरकार देखील बांबूची शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. बाबू शेतीसाठी सरकार अनेक योजना देखील सुरू करत आहेत. कारण बांबूला जास्त प्रमाणात देश विदेशातून मागणी देखील आहेत. बांबूपासून अनेक गोष्टी देखील तयार करत जातात. अशातच आता महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार जुनी अटल बांबू समृद्धी योजना रद्द केली आहे, आणि आता नवीन अटल बांबू समृद्धी योजना मंजूर केलेली आहे. त्यामुळे आता चालू वर्षासाठी बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावा.

अटल बांबू समृद्धी योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी बांबू शेतकऱ्यांचा समूह यातील सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येते. परंतु जर खाजगी शेतकऱ्याकडून एकट्या शेतकऱ्यांचा अर्ज आला, तर त्याचा विचार केला जाईल. ऑनलाइन अर्ज करताना अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड, नवीन सातबारा उतारा, बँकेचे पासबुकचे पहिल्या पाण्याची झेरॉक्स, कॅन्सल केलेल्या चेक इत्यादी कागदपत्र अपलोड करावे लागेल.

काय आहे योजना? | Bamboo Plantation Scheme

या योजनेअंतर्गत आता टिशू कल्चर बांबू (Bamboo Plantation Scheme) रोपे पुरवठा यांच्या देखराखीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला सरकारकडून 50 टक्के रक्कम मिळणार आहे ही अनुदानाची विभागणी पहिल्या वर्षात 90 रुपये दुसऱ्या वर्षात 50 रुपये आणि तिसऱ्या 35 रुपये प्रतिरोप एवढी असणार आहे. या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रासाठी 600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे 1200 बांबू रोपे दिली जाणार आहेत.

निवड कशी होईल ?

आता बांबू लागवडीसाठी बांबूची कोणती प्रजाती निवडायची. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांकडून माहिती घेऊन स्वतः योग्य पद्धतीने निवड करायचे आहे. आणि त्यानंतर प्रजातीनिहाय संख्या ऑनलाईन अर्जात नमूद करायची आहे. त्यानंतर कुठलीही संस्था कंपनी बांबू शेतकऱ्यांचा समूह यांचे सभासदांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि नंतर चालू वर्षाच्या पावसाळ्यात महाराष्ट्र बांबू विकास मंडळकडून टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यात येईल.