आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवरील बंदी आणखी एक महिना वाढली, DGCA ने जारी केली अधिसूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारने म्हटले आहे की,”आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 30 सप्टेंबरपर्यंत कायम राहील. नागरी उड्डयन महासंचालकांनी (DGCA) आंतरराष्ट्रीय अनुसूचित व्यावसायिक प्रवासी विमानांच्या उड्डाणांवरील बंदी आणखी एक महिना वाढवली आहे. यापूर्वी ही बंदी 31 ऑगस्टला संपणार होती.”

DGCA ने जून महिन्यात जारी केलेल्या परिपत्रकात सुधारणा करून ही बंदी वाढवण्याचे आदेश जारी केले असून, ही बंदी 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील असे म्हटले आहे. परिपत्रकानुसार, ही बंदी आंतरराष्ट्रीय कार्गो ऑपरेशन्स आणि DGCA ने मंजूर केलेल्या विशेष उड्डाणांवर लागू होणार नाही.

कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. तथापि, वंदे भारत अभियान आणि एअर बबल सिस्टीम अंतर्गत, मे महिन्यापासून काही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्याची परवानगी आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45083 नवीन रुग्ण, 460 मृत्यू
विशेष म्हणजे, आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 45 हजार 83 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर या कालावधीत 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 31,265 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन कोरोना रूग्ण मिळाल्यानंतर आता देशातील संक्रमित लोकांची एकूण संख्या 3 कोटी 26 लाख 95 हजार 30 वर गेली आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आता कोरोनाची 3 लाख 68 हजार 558 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 3 कोटी 18 लाख 88 हजार 642 लोकं बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आतापर्यंत 4 लाख 37 हजार 830 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 63,09,17,927 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Comment