हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Banana Farming आजकाल अनेक शेतकरी हे फळ बागांची देखील शेती करत आहेत. अनेक बागायतदार हे केळीची लागवड करतात. देशातील बहुतांशी राज्य अशी आहेत, ज्या राज्यांमध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या खरीप हंगामाच्या बागायतदारांनी केळीची (Banana Farming) लागवड केली आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण यावर्षी उष्णतेमुळे केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण भारतात एप्रिल महिन्यात खूप उष्णता निर्माण झालेली आहे. त्याचा फटका पुढील महिन्यात देखील पाहायला मिळणार आहे. जोरदार उष्णतेच्या वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे झाडांमधील आद्रता कमी होऊन झाडे सुकणे किंवा झाडे पडणे यांसारख्या गोष्टी देखील उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात केळीच्या पिकाचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
गरम वाऱ्यामुळे केळीचे झाडे पडू शकतात | Banana Farming
यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे केळीची पिके ही सुकू शकतात. जर शेतकऱ्यांनी वेळीच केळीच्या पिकाचे व्यवस्थापन केले नाही, तर 30% पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. कारण जोरदार उष्णतेच्या वाऱ्यामुळे हीच केळीचे झाडे पडू देखील शकतात. यावेळी शेतकऱ्यांनी शेतात ओलावा टिकून ठेवणे खूप गरजेचे आहे. झाडे जास्त कोरडी पडून देऊ नका. त्याचप्रमाणे उष्णतेच्या लाटेपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी नैऋत्य दिशेला जाळी बसवावी. म्हणजेच उन्हाचा मारा पिकांवर पडणार नाही.
गरम हवेपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे
केळीच्या झाडांना एप्रिल-मे महिन्यात गुच्छ फळे आली तर शेतकऱ्यांसाठी धोका अधिक वाढतो. एप्रिल-मे महिन्यात केळीचे घड निघणार नाहीत अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केळी बागांचे व्यवस्थापन करावे.केळी पिकात घड दिसू लागले असतील तर ते झाकून टाकावे कारण उष्माघातामुळे केळीचे घडही काळे पडतात. याशिवाय उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शेतकरी केळीचे घड सुक्या केळीच्या पानांनी झाकून ठेवू शकतात. पॉली बॅगने झाकूनही शेतकरी गरम हवेपासून संरक्षण करू शकतात.
केळीच्या रोपामध्ये ओलावा टिकवून ठेवा
उन्हाळी हंगामात केळीचे पीक टिकवण्यासाठी झाडांमध्ये ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उष्ण हवामानात, रोपातून पाण्याचे बाष्पीभवन खूप वेगाने सुरू होते. शेतकऱ्यांनी केळीच्या झाडांच्या ताटात कोरडी पाने ठेवावीत किंवा पिकाच्या अवशेषांचे मल्चिंग देखील केले जाऊ शकते, ज्यामुळे झाडांमध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो.