हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bangladesh Fighter Jet Crash । अहमदाबाद विमान अपघाताप्रमाणे आणखी एक विमान थेट शाळेवर कोसळलं आहे. मात्र हि घटना भारतात नव्हे तर बांगलादेश मध्ये घडली आहे. अंडी जे विमान कोसळलं ते प्रवासी विमान नव्हतं तर लष्कराचे विमान होते. या विमान अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे बोललं जातंय तर काहीजण जखमी झाले आहेत. ढाका शहराच्या उत्तर भागात हि दुर्घटना घडली असून घटनास्थळी आग आणि धुराचे लोट बघायला मिळत आहेत.
शाळेच्या कॅम्पसचे मोठे नुकसान- Bangladesh Fighter Jet Crash
याबाबत अधिक माहिती अशी कि , F-7 BGI असं या हवाई दलाच्या विमानाचे नाव होते. बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हे विमान कोसळलं. विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि उड्डाणानंतर लगेचच ते कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली. आग विझवण्यासाठी आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क कार्यालयाने या अपघातात आत्तापर्यंत १ मृत्यू आणि १०० हुन अधिक जखमी झाल्याचे सांगितलं आहे.
One person was killed as a Bangladesh air force training aircraft crashed in a college campus in the capital city of Dhaka today, a fire services official said: Reuters
— ANI (@ANI) July 21, 2025
विमान थेट शाळेवर कोसळल्याने (Bangladesh Fighter Jet Crash) शाळेच्या कॅम्पसचे मोठे नुकसान झाले आहे. घटनस्थळी आग आणि धुराचे लोट पाहायला मिळाले. विमान अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात स्पष्टपणे जळत्या ढिगाऱ्याचे आणि जखमींचे फोटो दिसत आहेत. तसेच आरडाओरडा सुरु आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु या विमान अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशचे सध्याचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हंटल की सरकार अपघाताची कारणे तपासेल आणि सर्व प्रकारची मदत सुनिश्चित करेल. या अपघातात हवाई दल, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजचे कर्मचारी आणि इतरांचे झालेले नुकसान अपूरणीय आहे. हा देशासाठी खोलवर रुतलेला असा दु:खाचा क्षण आहे.




