नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी विजय मल्ल्याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका खटल्यातील कागदपत्रे चक्क सुप्रीम कोर्टातून गहाळ झाली आहेत. त्यामुळं या याचिकेवरील सुनावणी २० ऑगस्टपर्यंत टाळण्यात आली आहे. विजय मल्ल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लघन करत संपत्ती मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी 2017 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी मल्ल्याने याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी जवळपास ३ वर्षांनंतर आज लिस्ट करण्यात आली होती. या खटल्यासंदर्भातील विजय मल्ल्या संदर्भातील एक कागदपत्र न मिळाल्याने आज गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळं कोर्टाने या याचिकेवरील सुनावणी 14 दिवस तहकूब केली आहे.
दरम्यान, विजय मल्ल्याची याचिका उशिराने लिस्ट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली होती. २०१७ साली दिलेल्या आदेशावरील पुनर्विचार याचिका आता सुनावणीस आली होती. ही याचिका आतापर्यंत का न्यायालयासमोर आली नव्हती अशी विचारणा रजिस्ट्रीकडे करण्यात आली होती. तसेच यावर २ आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले होते.
बंद किंगफिशर एअरलाइन्सचा (Kingfisher Airlines)मालक असलेल्या विजय मल्ल्याकडे देशातील 17 बँकांचं 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. परंतु मल्ल्या मार्च 2016 मध्ये भारत सोडून ब्रिटनमध्ये पळून गेला होता. भारतीय एजन्सींने यूके कोर्टात मल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी अपील केलं होतं. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर यूके कोर्टाने 14 मे रोजी मल्याच्या भारत प्रत्यार्पणाच्या अपीलवर शिक्कामोर्तब केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”