हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : फिक्स्ड डिपॉझिट (FD) हे अनेक लोकांच्या गुंतवणुकीचे एक लोकप्रिय साधन आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक. आजकाल सर्वच बँका आपल्या FD चे व्याजदर वाढवत आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे चांगले दिवस परत आले आहेत. यामध्येच आता खाजगी क्षेत्रातील एक्सिस बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेनेही आपल्या FD च्या व्याजदर वाढीची घोषणा केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला बँकांनी FD चे (Bank FD) व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली होती. मात्र रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर आणि CRR (कॅश रिझर्व्ह रेशो) मध्ये वाढ करण्याच्या निर्णयानंतर त्यात पुन्हा वाढ होत आहे.
Canara Bank FD चे व्याजदर
कालावधी व्याजदर
7 दिवस ते 45 दिवस 2.9 टक्के
46 दिवस ते 90 दिवस 4.0 टक्के
91 दिवस ते 179 दिवस 4.5 टक्के
180 दिवस ते 269 दिवस 4.5 टक्के
1 वर्ष 5.3 टक्के
1 वर्षापेक्षा जास्त मात्र 2 वर्षांपेक्षा कमी 5.4 टक्के
270 दिवसांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी 4.55 टक्के
2-3 वर्ष 5.45 टक्के
3-5 वर्ष 5.7 टक्के
5-10 वर्ष 5.75 टक्के
त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांना सर्व डिपॉझिट्सवर 0.50 टक्के जास्त व्याज दर दिला जात आहे. 12 मे 2022 पासून पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
FD च्या अधिक माहितीसाठी कॅनरा बँकेच्या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=9
Axis Bank FD चे व्याजदर
एक्सिस बँक आता 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 2.5 टक्के ते 5.75 टक्के व्याज दर देत आहे. तर 9 महिने ते 1 वर्ष आणि 1 वर्ष ते 15 महिने FD वरील व्याजदर अनुक्रमे 4.75 टक्के आणि 5.25 टक्के करण्यात आला आहे. आता 15 महिन्यांपेक्षा जास्त मात्र 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 5.3 टक्के व्याज दिला जात आहे. एक्सिस बँकेकडून 2 ते 5 वर्षांच्या FD वर 5.6 टक्के तर 5 ते 10 वर्षांच्या FD वर 5.75 टक्के व्याज दर दिला जात आहे. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या FD वर 0.50 टक्के जास्त व्याज मिळेल. 12 मे 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
FD च्या अधिक माहितीसाठी एक्सिस बँकेच्या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
Bank Holidays : उद्यापासून सलग 3 दिवस बँका राहणार बंद !!!
Yes Bank कडून ग्राहकांना धक्का, मुदतपूर्व FD काढण्याच्या दंडात केली वाढ
FD Rates : आता ‘ही’ सरकारी बँक FD वर जास्त व्याज देणार, नवीन दर तपासा
FD Interest Rates : PNB कडून FD च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
Earn Money : ‘या’ नंबरची नोट मिळवून देईल लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या