हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : उद्या (30 मार्च 2023) रोजी देशभरात रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. ज्यामुळे अनेक राज्यांमधील बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. इतकेच नाही तर उद्या शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. हे लक्षात घ्या कि, हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना असलेल्या चैत्र महिन्यात रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी RBI कडून सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे लक्षात घ्या कि, RBI कडून आपल्या वेबसाईटवर सुट्ट्यांची लिस्ट रिलीज केली जाते. यामध्ये सुट्ट्यांचे एकूण तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स एक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स एक्ट अँड रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि तिसरी रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे अशा तीन श्रेणी आहेत. या सुट्टीच्या दिवशी बँकेमध्ये कोणतेही काम पूर्ण होणार नाही. आजकाल बहुतेक बँकिंग सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. याशिवाय बँकांचे एटीएम आणि ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल. Bank Holiday
कोणकोणत्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील
मुंबई, नागपूर, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, डेहराडून, जयपूर, भोपाळ, कानपूर, लखनौ, पाटणा, रांचीसहीत अनेक मोठ्या शहरांमध्ये उद्या बँका बंद राहणार आहेत. तसेच पणजी, रायपूर, शिलाँग, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये उद्या बँका सुरूच राहतील. या आर्थिक वर्षातील ही शेवटची बँकैची सुट्टी असेल. Bank Holiday
एप्रिलमध्ये बँका किती दिवस बंद राहणार
एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसहीत एकूण 15 बँकांना सुट्ट्या असतील. 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने सर्व बँका बंद राहतील. यानंतर 2, 4, 5, 7, 8, 9, 14, 15, 16, 18, 21, 22, 23 आणि 29 एप्रिल रोजी बँका बंद राहतील. Bank Holiday
शेअर बाजारही बंद राहणार
उद्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येणार नाही. रामनवमीनिमित्त शेअर बाजारही बंद राहणार आहे. शेअर बाजार साप्ताहिक सुट्ट्या व्यतिरिक्त मोठ्या सणांच्या निमित्तानेही बंद ठेवला जातो. आता शेअर बाजार शुक्रवारी सकाळी 9.15 वाजता उघडेल. Bank Holiday
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Marriage Certificate बनवणे महत्वाचे का आहे ??? तपासा त्यासाठीची प्रक्रिया
18 मार्च ला फरार झाल्यानंतर अमृतपालचा पहिला Video समोर; म्हणाला की…
Investment Tips : शेअर बाजारातून भरपूर पैसे कमवण्यासाठी फॉलो करा वॉरन बफे यांचे ‘हे’ नियम
आता 2 हजारांहून जास्तीच्या UPI ट्रान्सझॅक्शनवर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
Success Story : बिनकामाची म्हणत ज्या कल्पनेला धुडकावले गेले त्यावरच स्थापन केली 8200 कोटींची कंपनी