Success Story : बिनकामाची म्हणत ज्या कल्पनेला धुडकावले गेले त्यावरच स्थापन केली 8200 कोटींची कंपनी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : अमेरिकन फिनटेक फर्म स्टॅक्सच्या सह-संस्थापक आणि सीईओ सुनीरा माधनी यांच्या ज्या कल्पनेला नावे ठेवत लोकांनी त्याकडे कानाडोळा केला, त्याच कल्पनेच्या जोरावर आपल्या भावासोबत त्यांनी 8,200 कोटी रुपयांची कंपनी उभी केली. सुनीराने फक्त एक यशस्वी स्टार्टअपच तयार केला नाही, तर आपल्या व्यवसायासाठी पैसेही जमवत त्यांनी महिला यशस्वीपणे व्यवसाय चालवू शकत नाहीत, ही अमेरिकेची धारणा देखील मोडून काढली. या चुकीच्या समजुतीमुळे महिला उद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी पैसे मिळवण्यात खूप अडचणी येतात.

How Suneera Madhani beat self-doubt to build a billion-dollar start-up

मूळच्या पाकिस्तानी असलेल्या सुनीरा माधनी यांचे आई-वडील पाकिस्तानातून अमेरिकेत गेले. अशातच फॅमिली व्यवसाय बुडाल्याने त्यांच्या वडिलांना मोठे आर्थिक नुकसान देखील सोसावे लागले. फ्लोरिडा विद्यापीठातून सुनीरा यांनी फायनान्सचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी पेमेंट प्रोसेसर कंपनी फर्स्ट डेटामध्ये नोकरी सुरू केली. यावेळी त्यांचे काम बिझनेस ओनरला पेमेंट टर्मिनल विकणे हे होते. Success Story

मात्र नोकरी करत असतानाच सुनीरा यांच्या लक्षात आले की, त्यांच्या कंपनीचे पेमेंट प्लॅटफॉर्म पर्सनटेंज ऑफ सेल मॉडेल वापरून ग्राहकांकडून शुल्क आकारत आहेत. मात्र अनेक ग्राहकांचा कल हा फ्लॅट रेटवर आधारित मंथली सब्‍सक्रिप्‍शन घेण्याकडे जास्त आहे. यावेळी आपल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ग्राहकांना हा पर्याय उपलभड देण्याविषयी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे सांगत त्यांनी सुनीराची ही कल्पना नाकारली. Success Story

U.S. News & World Report's 360 Reviews Names Stax as the Best Credit Card  Processing Company of 2021 | Financial IT

अशा प्रकारे सुरु केले स्टार्टअप

या कल्पनेवर सुनीराने आपल्या पालकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या वडिलांनी सल्ला दिला की, ही कल्पना इतरांना देण्याऐवजी तिने स्वतःच स्टार्टअप सुरु करावा. त्यावेळी भांडवल म्हणून सुनीरा यांच्याकडे फक्त त्यांचा सहा महिन्यांचा पगारच होता. Success Story

2014 मध्ये लाँच केले स्टॅक्स

यानंतर 2014 साली सुनीरा माधानी यांनी आपला भाऊ रहमतुल्लासोबत स्टॅक्स कंपनीची स्थापना केली. इतर पेमेंट प्लॅटफॉर्म हे पर्सेंटेज ऑफ सेल्‍स मॉडेलवर काम करत असताना, स्टॅक्सने मात्र फ्लॅट रेट मंथली सब्‍सक्रिप्‍शन मॉडेलवर काम करण्यास सुरुवात केली. आपल्या व्यवसायासाठी सिलिकॉन सुनीराने व्हॅलीऐवजी ऑरलँडोची निवड केली. इथे त्यांनासुरुवातीला 100 क्लायंट मिळाले. पुढे जाऊन सुनीराला आपली कंपनी 145 कोटींमध्ये विकण्याची ऑफरही आली होती. मात्र, त्यांनी ती साफ फेटाळली. Success Story

Suneera Madhani | EY - Global

आज कंपनीची किंमत आहे 8200 कोटी

सुनीराच्या कंपनी स्टॅकची किंमत आज 8200 कोटी रुपये आहे. त्यांच्या कंपनीत 300 कर्मचारी काम करत आहेत. गेल्या आठ वर्षांत, स्टॅक्सने $23 अब्ज किमतीचे ट्रान्सझॅक्शन हाताळले आहेत. सुनीराने सीईओ स्कूल नावाचा एक बचत गटही स्थापन केला आहे. सुमारे 3 लाख नोकरदार महिला याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. Success Story

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.stax.com/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर