नवी दिल्ली । नोव्हेंबर महिना सुरू झाल्याने सणही सुरू राहणार आहेत. अशा स्थितीत बहुतांश विभागांना सुट्टी असेल. यामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट देखील जारी केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, धनत्रयोदशी, दिवाळी, भाई दूज, छठ पूजा आणि गुरु नानक जयंती यांसारख्या मोठ्या सणांसह, एकूण 17 दिवस बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही.
मात्र, या 17 दिवसांच्या सुट्या देशभरातील बँकांमध्ये एकत्र राहणार नाहीत. काही राज्यांमध्ये, तेथे साजरे होणारे सण आणि उत्सव यावर अवलंबून अतिरिक्त सुट्ट्या असतील. RBI दर महिन्याला सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट रिलीज करते.
कोणत्या राज्यात बँका कधी आणि केव्हा बंद होतील ते जाणून घेऊयात
नोव्हेंबर 1 – कन्नड राज्योत्सव आणि कुटमुळे बेंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद राहतील.
3 नोव्हेंबर – नरका चतुर्दशीनिमित्त बंगळुरूमध्ये बँकेला सुट्टी असेल.
4 नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या/काली पूजेमुळे बेंगळुरू वगळता सर्व शहरातील बँका बंद राहतील.
५ नोव्हेंबर – अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथील बँका दिवाळी/नववर्ष/गोवर्धन पूजेमुळे चालू राहणार नाहीत.
6 नोव्हेंबर – गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे भाईदूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मीपूजा/दीपावलीमुळे बँका बंद राहतील.
7 नोव्हेंबर – या दिवशी रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
10 नोव्हेंबर – छठ पूजा/सूर्यषष्ठी/दला छठ निमित्त पाटणा आणि रांची येथे बँक सुट्टी असेल.
11 नोव्हेंबर- पाटणामध्ये छठपूजेमुळे बँका बंद राहणार आहेत.
१२ नोव्हेंबर- वंगला महोत्सवानिमित्त शिलाँगमध्ये बँक बंद राहणार आहे.
13 नोव्हेंबर – 13 नोव्हेंबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार आहे.
14 नोव्हेंबर – रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असेल.
19 नोव्हेंबर – गुरू नानक जयंती/कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद राहतील.
21 नोव्हेंबर – रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
22 नोव्हेंबर – कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
23 नोव्हेंबर- सेंग कुत्स्नामच्या निमित्ताने शिलाँग बँका काम करणार नाहीत.
28, नोव्हेंबर – रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.