नवी दिल्ली । देशातील सणांनी नोव्हेंबरचा महिना सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही अनेक राज्यांमध्ये सणांचे वातावरण आहे. अशा स्थितीत या राज्यांतील बहुतांश विभागांना सुट्टी असेल. यामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महिन्याच्या सुरुवातीला बँक सुट्ट्यांची लिस्ट जारी केली होती. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यात विविध राज्यांमध्ये 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, यापैकी काही सुट्ट्या देशभरातील बँकांमध्ये एकत्र राहणार नाहीत. काही राज्यांमध्ये, तेथे साजरे होणारे सण आणि उत्सव यावर अवलंबून अतिरिक्त सुट्ट्या असतील.
या आठवड्यात बँकांना 5 दिवस सुट्टी असेल
बँकेच्या ग्राहकांना शाखेशी संबंधित महत्त्वाच्या कामांना सामोरे जावे लागत असेल तर ते आठवड्याच्या सुरुवातीलाच करा. RBI ने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत 10, 11 आणि 12 नोव्हेंबरला सुट्टी जाहीर केली आहे. RBI ने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या लिस्ट नुसार, तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामे उरकून घ्या. याच्या मदतीने तुम्ही पुन्हा शाखेत जाणे, कामात अडकणे यासारख्या समस्या टाळू शकता.
नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने झाली. बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट पाहूयात…
पाटणा आणि रांचीमध्ये 10 नोव्हेंबरला छठपूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
11 नोव्हेंबरला छठपूजेच्या दिवशी पाटण्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
12 नोव्हेंबरला वंगला उत्सवानिमित्त शिलाँगमधील सर्व बँका बंद राहतील.
13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँकांमधील कामकाज बंद राहणार आहे.
14 नोव्हेंबर रोजी देशभरातील बँकांना रविवारची सुट्टी असेल.
बँक ग्राहकांनी त्यांच्या राज्यांतील सणांच्या आधारे सुटीनुसार शाखेशी संबंधित संबंधित कामे उरकून घ्यावीत. त्यामुळे शाखा बंद असण्याच्या त्रासातून त्यांची सुटका होणार आहे.