नवी दिल्ली । नोव्हेंबर महिना अर्धा संपला. या महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी, भाऊबीज, इतर सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांसह देशभरातील विविध राज्यांतील बँका 11 दिवस बंद राहिल्या. आता 15 नोव्हेंबर म्हणजेच सोमवार ते 30 नोव्हेंबरपर्यंत बँका 6 दिवस बंद राहतील. मात्र, सणासुदीचा हंगाम संपल्याने बँकांना पूर्वीइतक्या सुट्या मिळणार नाहीत.
दरम्यान, जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही सुट्ट्यांची लिस्ट पाहून आधीच ते हाताळू शकता. RBI दर महिन्याला सुट्यांची संपूर्ण लिस्ट जारी करते. यामध्ये वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्ट्या निश्चित केल्या जातात. चला तर मग कोणत्या राज्यात बँका कधी बंद राहणार आहेत जाणून घेऊयात …
सुट्ट्यांची लिस्ट पहा
19 नोव्हेंबर – गुरू नानक जयंती/कार्तिक पौर्णिमेमुळे आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद राहतील.
21 नोव्हेंबर – रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
22 नोव्हेंबर- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नामच्या निमित्ताने शिलाँग बँकांमध्ये कोणताही व्यवसाय होणार नाही.
28, नोव्हेंबर – रविवार असल्याने देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
‘या’ कामांवर परिणाम होईल
बँकांचे बहुतेक काम ऑनलाइन झाले आहे तरीही चेक क्लिअरन्स किंवा KYC सारख्या काही महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जावे लागते. कामाला सुट्टी असताना बँकांमध्ये KYC अपडेट करण्यासारख्या कामात अडचणी येतात. याशिवाय चेक क्लिअरन्सच्या प्रक्रियेलाही उशीर होतो.