पुढील तीन दिवसात बँकेची महत्वाची कामं उरका, कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पुढील तीन दिवसात  बँकेशी संबंधित काही काम असतील तर लवकर उरका.  कारण या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस बँकांना सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे गुरुवार 24 डिसेंबरपर्यंत बँकेची कामं न उरकल्यास सोमवार 28 डिसेंबरपर्यंत थांबावं लागेल. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करायची कामे ग्राहकांना येत्या गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावी लागतील. (Bank Holiday’s)

शुक्रवार 25 डिसेंबरला नाताळनिमित्त बँकांना सुट्टी असेल. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी येणारा शनिवार हा ‘फोर्थ सॅटर्डे’ आहे. त्यामुळेच 26 डिसेंबरलाही बँका बंद असतील. तर 27 डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका उघडणार नाहीत. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल.

ज्या ग्राहकांना बँकेत जाऊन पैसे काढणे, भरणे, चेक जमा करणे अथवा अन्य महत्त्वाची कामं करायची आहेत, त्यांनी ती गुरुवारपर्यंत करणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात या कालावधीत ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस बँका बंद असतानाही तुम्ही ऑनलाईन ट्रँझॅक्शन सुरळीतपणे करु शकाल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’