Bank Holidays in February 2024 : फेब्रुवारीत सुट्ट्याच सुट्या!! इतक्या दिवस बँका राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bank Holidays in February 2024 : सध्या जानेवारी महिना संपत आला असून ४ दिवसात फेब्रुवारी महिना सुरु होईल. फेब्रुवारी महिन्यात तुमची बँकेत काही कामे असतील तर ती फटाफट उरकून घ्या.. कारण फेब्रुवारी मध्ये तब्बल 11 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. यामध्ये शनिवार- रविवार आणि काही सणांचा समावेश आहे. त्यामुळे सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहूनच बँकेत पाऊल टाका अन्यथा तुमचा कामाचा खोळंबा होऊ शकतो.

कोणत्या दिवशी बँका बंद – Bank Holidays in February 2024

सर्वात आधी ४ फेब्रुवारी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. यानंतर 10 फेब्रुवारीला दुसरा शनिवार असून 11 फेब्रुवारीला रविवार आहे त्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे. 14 फेब्रुवारीला बसंत पंचमी आहे, त्यानिमित्ताने काही ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खास करून त्रिपुरा , पश्चिम बंगाल, आणि ओरिसामध्ये बँकांचा समावेश असेल . 15 फेब्रुवारीला मणिपूरमध्ये लुई-न्गाई-नीमुळे बँका बंद राहतील. त्यानंतर 18 फेब्रुवारीला रविवार मुळे बँकांना सुट्टी राहील. पुढे १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्त महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी असेल. 20 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्येहा राज्य दिन असल्याने बँकेला सुट्टी आहे. तर त्यानंतर 24 फेब्रुवारी चौथा शनिवार असल्याने बँकां बंद राहतील. 25 फेब्रुवारीला रविवार असल्याने बँकांना पुन्हा सुट्टी राहील. 26 फेब्रुवारीला न्योकुममुळे फक्त अरुणाचल प्रदेशातील बँकांना सुट्टी असेल. (Bank Holidays in February 2024)

सध्याचे जग हे ऑनलाईन जग आहे असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे एकमेकांना पैसे पाठवायचे असतील तर आता बँकेत जाण्याची गरज लागत नाही, मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगच्या मदतीने तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकता. मोबाईल मधून अगदी काही मिनिटात पैसे पाठवता येतात. त्यामुळे बँकेत जाण्याचा संबध आता जास्त येत नाही. परंतु काही कामे अशी असतात कि ज्यासाठी तुम्हाला बँकेत जावंच लागत.