Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये ICIC Bank आणि PNB चे नावही सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकांनी विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये वाढ केली आहे. ज्यामुळे आता या बँकांकडून कर्ज घेणे महागणार आहे. बँकेचे नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील.

UPI app user alert! ICICI Bank issues advisory against scams, says don't do  THIS | Business News – India TV

ICICI बँकेने MCLR मध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता एक वर्षाचा MCLR 0.25 टक्क्यांनी वाढून 8.65 टक्के झाला आहे. आतापर्यंत तो 8.40 टक्के होता. त्याच प्रमाणे एक महिन्याचा MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.40 टक्के, तीन महिन्यांचा MCLR 8.45 टक्के, 6 महिन्यांसाठीचा MCLR 8.60 टक्के तर एका दिवसासाठीचा MCLR 8.50 टक्के करण्यात आला आहे. Bank Loan

Punjab National Bank's profit more than doubles to Rs 1,127 cr in Dec  quarter | The Financial Express

पंजाब नॅशनल बँकेने MCLR 0.20 वरून 0.40 टक्के केला आहे. यानंतर बँकेने एक वर्षाचा MCLR 0.20 टक्क्यांनी वाढवून 8.30 टक्के केला आहे. आतापर्यंत तो 8.10 टक्के होता. त्याच प्रमाणे आता एक महिन्याचा MCLR 0.40 टक्क्यांनी वाढवून 7.90 टक्के, तीन महिन्यांचा MCLR 0.40 टक्क्यांनी वाढवून 8.00 टक्के, 6 महिन्यांचा MCLR 0.40 टक्‍क्‍यांनी 8.20 टक्के आणि एक दिवसाचा MCLR 0.35 टक्‍क्‍यांनी वाढवून 7.80 टक्के झाला आहे.

What is EMI - Meaning of EMI and How EMI is Calculated | IDFC FIRST Bank

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank Loan

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank Loan

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.dcbbank.com/loans

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर