हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Locker Rules : जर आपल्याकडे बँकेचे खाते असेल आणि आपण बँकेचे लॉकर वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. बँकेचे लॉकर वापरण्या आधी आपल्याला RBI च्या लॉकर नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या कि, 1 जानेवारी 2023 रोजी पासून RBI लॉकर्सशी संबंधित नियम बदलणार आहेत. ज्यानंतर आता बँकांना लॉकरबाबत ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही.
यानंतर लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे खूप नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असणार आहे. याशिवाय ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल. त्याबरोबरच बँकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या या बदलाची माहिती ग्राहकांना एसएमएस आणि इतर माध्यमातून द्यावी लागेल. Bank Locker Rules
रिन्यूअलसाठी करावा लागेल करार
आता ग्राहकांना नवीन लॉकरच्या करारासाठी आपली पात्रता दर्शवावी लागेल. तसेच 1 जानेवारी 2023 आधीच त्याच्या रिन्यूअलसाठी करार करावा लागेल. हे लक्षात घ्या PNB सारख्या काही बँका देखील लॉकरच्या कराराबाबत ग्राहकांना माहिती देण्यासाठी एसएमएस पाठवत आहेत. या मेसेजमध्ये बँकेने लिहिले की, ‘RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लॉकरसाठीचा करार 31 डिसेंबर 2022 पूर्वी अंमलात आणायचा आहे’. Bank Locker Rules
आता बँकांना द्यावी लागणार नुकसानभरपाई
RBI च्या या नवीन नियमांनुसार, आता बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या सामग्रीचे काही नुकसान झाल्यास बँकेला त्याची पूर्ण भरपाई द्यावी लागणार आहे. तसेच ज्या जागेमध्ये सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स ठेवले आहेत, त्या जागेच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलणे ही बँकांची जबाबदारी आहे. यामुबरोबरच जर बँकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे नुकसान झाल्यास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट पर्यंत नुकसानभरपाई द्यावी लागेल. Bank Locker Rules
अशा परिस्थितीमध्ये भरपाई दिली जाणार नाही
हे लक्षात घ्या कि, ग्राहकाच्या चुकीमुळे अथवा निष्काळजीपणामुळे,तसेच भूकंप, पूर, वीज, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे लॉकरमधील सामग्रीचे नुकसान झाल्यास यासाठी बँक जबाबदार ठरणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही. Bank Locker Rules
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonperson/English/Scripts/Notification.aspx?Id=1341
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर
DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळेल 8.35% व्याज
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा