हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : चेकद्वारे व्यवहार करणाऱ्या Bank of Baroda (BOB) च्या ग्राहकांसाठी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. कारण बँकेकडून आजपासून चेक पेमेंट्सशी संबंधित नियम बदलण्यात आले आहेत. आता या नवीन नियमांनुसार बँकेत चेक जमा न केल्यास तो रद्द केला जाऊ शकतो. बँकेने 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेसह पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू केली आहे.
जानेवारी 2021 मध्येच RBI कडून बँकांना PPS लागू करण्यास सांगितले गेले होते. मात्र अजूनही अनेक बँकांनी ते लागू केलेले नाही. RBI च्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊनच Bank of Baroda कडून 1 ऑगस्टपासून PPS लागू केले आहे. चेक संबंधित होणारी फसवणूक रोखण्यासाठो RBI ने ही सिस्टीम सुरु केली आहे.
पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे काय ???
पॉझिटिव्ह पे सिस्टीम (पीपीएस) ही एक अशी सिस्टीम आहे ज्यामध्ये चेक जारी करणाऱ्याला चेक घेणाऱ्याचे डिटेल्स जसे कि एसएमएस, मोबाइल एप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे द्यावे लागतात. ज्यामध्ये चेकची रक्कम, लाभार्थीचे नाव, अकाउंट नंबर, चेक नंबर आणि इतर माहितीचा समावेश आहे. मात्र जर चेक जारी करणाऱ्या ग्राहकाने ही माहिती बँकेला दिली नाही तर बँकेकडून चेक क्लिअर केला जाणार नाही. Bank of Baroda
जूनमध्येच ग्राहकांना देण्यात आली होती माहिती
Bank of Baroda ने जूनमध्येच 5 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यावेळी बँकेने म्हटले होते की,” जर 1 ऑगस्ट 2022 नंतर कोणत्याही ग्राहकाने PPS व्हेरिफिकेशनशिवाय चेक जारी केला तर त्याचा चेक साफ नाकारला जाईल आणि चेक परत केला जाईल.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/-/media/project/bob/countrywebsites/india/pdfs/key-features-and-confirmation-format-for-branchess.pdf
हे पण वाचा :
Hyundai Palisade 2022 : ह्युंदाईची ‘ही’ 7 सीटर SUV लवकरच बाजारात; पहा फीचर्स आणि किंमत
ITR भरण्यासाठी PAN-Aadhaar Link असणे का महत्वाचे आहे ???
Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण !!! नवीन दर पहा
‘या’ e-bike साठी ड्रायव्हिंग लायसन्सची नाही आवश्यकता !!!
ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा; असा करा क्लेम