Bank Of Baroda कडून MCLR मध्ये वाढ, आता लोनसाठी द्यावे लागणार जास्त व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Of Baroda : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Bank Of Baroda चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 65 bps पॉईंटने वाढ केली आहे. यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. बँकेचे नवीन दर 12 नोव्हेंबर 2022 पासून लागू होतील.

Bank of Baroda Sets Big Targets for Mobile Banking - BusinessToday - Issue Date: Mar 06, 2022

Bank Of Baroda ने एका वर्षाच्या कर्जासाठीचा MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून 8.05 टक्के केला आहे. पर्सनल, कार आणि होम लोन यांसारखी बहुतांश ग्राहक कर्जे या दराने जोडलेली आहेत.बँकेने सहा महिन्यांचा MCLR 10 बेसिस पॉइंट्सने वाढवून 7.90 टक्के केला आहे. तीन महिन्यांसाठी MCLR 7.75 टक्के असेल. त्याच वेळी, 12 नोव्हेंबरपासून, एक महिन्याचा MCLR 7.70 टक्के असेल.

सध्या, बँकेचे कर्मचारी नसलेल्या ग्राहकांकडून होम लोनवर 8.45 से 9.80 टक्के व्याज आकारले जाते, त्यानंतर कर्मचारी सदस्यांसाठी 8.45 टक्के व्याजदर आहे. बँक ऑफ बडोदा सध्या पर्सनल लोनवर 10.20 टक्क्यांवरून 17.55 टक्के व्याज घेत आहे. बँक ऑफ बडोदाकडून कार लोन घेणाऱ्यांचे व्याज 8.45% ते 11.45% पर्यंत असते.

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

Bank of Baroda-backed IndiaFirst Life Insurance files DRHP for IPO - The Hindu BusinessLine

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank Of Baroda

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank Of Baroda

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/retail-loans-interest-rates

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर