हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण एखादे लोन घेण्याचा विचार करत असाल तर आमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता Bank of Maharashtra ने वेगवेगळ्या कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 35 बेस पॉइंट्सची कपात केली आहे. 11 जुलै 2022 पासून बँकेचे हे नवीन दर लागू होतील.
याबाबत एक निवेदन जारी करत Bank of Maharashtra ने म्हटले की, यावेळी एक वर्षाचा MCLR 7.70 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, जो बहुतेक कन्झ्युमर लोनसाठी स्टॅण्डर्ड आहे. त्याचप्रमाणे, 6 महिन्यांच्या कालावधीसाठीचा MCLR 0.20 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. तो आता 7.40 टक्के झाला आहे. बँकेने पुढे सांगितले की,” तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दर 0.35 टक्क्यांनी 7.20 टक्क्यांनी कमी केला आहे.”
हे लक्षात घ्या कि, RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. अलीकडे, HDFC Bank, इंडियन ओव्हरसीज बँक, ICICI, येस बँक सारख्या बँकांनी देखील आपल्या वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR मध्ये वाढ केली आहे. Bank of Maharashtra
MCLR म्हणजे काय ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँकाकडून कर्जासाठीचा व्याजदर ठरवला जातो. 1 एप्रिल 2016 पासून RBI ने देशात MCLR सुरू केला. त्यापूर्वी सर्व बँकाकडून बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित केला जात असे. एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात झाल्यास त्याचा परिणाम नवीन आणि सध्याच्या कर्जदारांवर होतो. निधीची मार्जिनल कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट, कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) आणि कालावधी प्रीमियमच्या आधारावर त्याची गणना केली जाते. Bank of Maharashtra
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://bankofmaharashtra.in/retail_interest_rates
हे पण वाचा :
ज्येष्ठ नागरिकांच्या Health Insurance क्लेमसाठी जास्त का लागतो ??? यामागील कारणे जाणून घ्या
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 158 टक्के रिटर्न !!!
Audi A8 L 2022 :बाजारात धुमाकूळ घालणार Audiची A8 L लक्झरी सेडान; BMW, मर्सिडीजला देणार तगडी फाईट
Pm Kisan Samman Nidhi: ‘या’ लोकांना नाही मिळणार पैसे; तुम्ही पात्र आहात का ??
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण, नवीन दर पहा