Home Loan : कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : गेल्या महिन्यांत RBI कडून रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी पर्सनल होम लोन, ऑटो लोन आणि होम लोनचे दर वाढवले ​​आहेत. यावेळी रेपो रेट लिंक्ड लोन रेट (RLLR) आणि मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट (MCLR) मध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. सध्या परवडणाऱ्या दरात होम लोन मिळणे अवघड झाले आहे. चला तर मग देशातील प्रमुख बँकांकडून होम लोनसाठी किती व्याज दर आकारला जातो ते जाणून घेऊयात …

SBI | JPMorgan: State Bank of India joins JPMorgan's blockchain-based  payment network

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने होम लोनवरील किमान व्याजदर 7.55 टक्के केला आहे. 15 जूनपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच बँकेने आपला एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लोन रेट (EBLR) किमान 7.55 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यापूर्वी हा दर 7.05 टक्के होता. बँका EBLR वर क्रेडिट जोखीम प्रीमियम देखील जोडतात. आता बँक Home Loan  वर 7.55%-8.55% वार्षिक दराने व्याज आकारत आहे.

The 20% growth principle that built HDFC Bank | Mint

एचडीएफसी बँक : या बँकेच्या होम लोनचे व्याज वार्षिक 7.55 % पासून सुरू होते. HDFC 10 कोटी. 30 लाखांपर्यंत कर्ज देते. याचा परतफेड कालावधी 30 वर्षांपर्यंत आहे. Paisabazaar.com नुसार, बँका पगारदार/नॉन-वर्किंग प्रोफेशनल्ससाठी 30 लाखांपर्यंतचे होम लोन महिलांना 7.65%-8.15% आणि इतरांना 7.70%-8.20% दराने देतात. 30 ते 75 लाखांपर्यंतची कर्जे महिलांना 7.90%-8.40% आणि इतरांना 7.95%-8.45% होम लोन दर देतात. त्याचप्रमाणे, 75 लाखांवरील Home Loan महिलांना 8.00%-8.50% आणि इतरांना 8.05%-8.55% होम लोन देतात.

Bank of Baroda Q4 profit: Bank of Baroda climbs 3% on posting Rs 1,779  crore profit in Q4 vs loss year ago - The Economic Times

बँक ऑफ बडोदा : या बँकेकडून 20 कोटी रुपयांपर्यंतचे Home Loan दिले जाते. Paisabazaar.com नुसार, बँकेचा होम लोनचा व्याज दर वार्षिक 7.45% टक्के ते 9.20 टक्के आहे. बँक जास्तीत जास्त 30 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज देते. पगारदार व्यक्तीसाठी व्याज दर 7.45%-8.80% p.a. आहे तर नॉन सॅलराईड व्यक्तीला 7.55%-8.90% p.a. दराने व्याज द्यावे लागते.

UPI app user alert! ICICI Bank issues advisory against scams, says don't do  THIS | Business News – India TV

ICICI बँक : ICICI बँकेने 8 जूनपासून एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लोन रेट वार्षिक 8.60 टक्के केला आहे. Paisabazaar.com नुसार, बँक आता पगारदार व्यक्तीला 7.60% – 8.05% प्रतिवर्ष फ्लोटिंग व्याजदरासह रु. 35 लाखांपर्यंतचे Home Loan देत आहे, तर स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी 7.70% – 8.20% व्याजदर आहे. पगारदार व्यक्ती 7.60% – 8.20% व्याजदराने 35 लाख ते 75 लाख रुपये कर्ज घेऊ शकते, तर नोकरी नसलेल्या व्यक्तीला 7.70% – 8.35% दराने व्याज द्यावे लागेल. पगारदारांसाठी 7.60% – 8.30% आणि नोकऱ्या नसलेल्यांसाठी 7.70% – 8.45% p.a. रु. 75 लाखांपेक्षा जास्त होम लोनसाठी व्याजदर आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/home-loan-interest-rate.html

हे पण वाचा :

Business Idea : या ‘मसालेदार’ व्यवसायाद्वारे कमवा लाखो रुपये !!!

Stock Market : येत्या 2-3 आठवड्यात दुप्पट कमाई करण्यासाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवा पैसे !!!

HDFC Bank च्या ग्राहकांना धक्का !!! बँकेने आजपासून लागू केला हा नवा नियम

Stock Market : ‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!

Business Idea : फुलांच्या लागवडीद्वारे अशा प्रकारे कमवा हजारो रुपये !!!

Leave a Comment