हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : RBI कडून आतापर्यंत चार वेळा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये होम लोन घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता घर खरेदीदारांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. सध्या होम लोनवरील व्याजदर 8 टक्क्यांवर आला आहे.
मात्र सर्वच बँका आणि नॉन बँकिंग फायनान्सिंग कंपन्यांकडून होम लोनवर सारखे व्याजदर आकारले जात नाहीत. प्रत्येक बँके Home Loan च्या अटी आणि व्याजदरात बदल होतात. त्यामुळे जर आपण कर्ज घेणार असाल तर त्याआधी बँकांच्या व्याजदरांची माहिती घ्या. आज आपण स्वस्त दरात होम लोन देणाऱ्या NBFC आणि बँकांबाबत जाणून घेणार आहेत.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँकेकडून Home Loan वर 7.99 टक्के व्याज दर दिला जातो आहे. मात्र हे व्याज 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी आहे, जे 20 वर्षात फेडायचे आहे. त्यामुळे जर आपण कोटक महिंद्रा कडून कर्ज घेतले तर 62,686 रुपये EMI द्यावा लागेल.
युनियन बँक
स्वस्तात होम लोन देणाऱ्या बँकांच्या या लिस्टमध्ये युनियन बँकेचेही नाव सामील आहे. युनियन बँकेकडून 75 लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्यांना 20 वर्षांसाठी वार्षिक 7.75 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. यासाठी दर महा 61,571 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 75 लाख रुपयांच्या Home Loan वर 20 वर्षांच्या कालावधीसह 7.5 टक्के व्याजदर आकारला जात आहे. यामध्ये 60,419 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
IDBI बँक
ही बँक 20 वर्षांच्या कालावधीसाठी 75 लाख रुपयांच्या कर्जावर 8% व्याजदर देत आहे. त्याचप्रमाणे, LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून Home Loan साठी 8 टक्के तर आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स देखील त्याच दराने होम लोन देत आहे.
बजाज फायनान्स
या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीकडून 75 लाख रुपयांच्या 20 वर्षांच्या Home Loan साठी वार्षिक 7.7 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. या कर्जाचा ईएमआय 61,340 रुपये असेल.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेकडून 8.05 टक्के दराने Home Loan दिले जात आहे. यासाठी 62,967 रुपयांचा EMI भरावा लागेल. तसेच करूर वैश्य बँकेकडून 20 वर्षांसाठी 75 लाख रुपयांच्या कर्जावर 8.05 टक्के व्याज दिले जाते आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?menulevel=1&menuid=3&CatID=21
हे पण वाचा :
Stock Tips : सणासुदीच्या हंगामात ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स मिळवून देतील मोठा नफा, याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या
Indian Overseas Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याज दर पहा
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज