नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्त्वात असलेल्या बँकांचे एक कन्सोर्टियम किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या 6,200 कोटी रुपयांच्या कर्जाची वसूली करेल. मल्ल्याचे युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅक्डोव्हल होल्डिंग्स लिमिटेडमधील शेअर्स 23 जून रोजी मोठ्या प्रमाणात सौद्यांद्वारे विकले जातील. मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर 2012 पासून बंद आहे. कर्ज फेडण्यासाठी आणि बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी जानेवारी 2019 मध्ये मल्ल्याला देशातून फरारी आर्थिक अपराधी म्हणून घोषित करण्यात आले होते. तो ब्रिटनच्या न्यायालयात प्रत्यार्पणाच्या विरोधात खटला लढवत आहे, जर मल्ल्याचे शेअर्स विकले गेले तर किंगफिशर विजय मल्ल्या प्रकरणातील बँकांची ही पहिली मोठी वसुली असेल. किंगफिशरला दिलेले कर्ज 2012 च्या उत्तरार्धात नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) झाले. मार्च 2016 मध्ये मल्ल्या देश सोडून गेला. त्याच्यावर 17 बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
शेअर्सची विक्री बेंगळुरूच्या डेबट रिकव्हरी ट्रिब्यूनलच्या देखरेखीखाली होईल.
मनीकंट्रोलला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, शेअर्सची विक्री बेंगळुरूच्या डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल (DRT) च्या देखरेखीखाली होईल, ज्याने 6,203 कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी शेअर्सची विक्री करण्याचे वसुली अधिकाऱ्यास अधिकार दिले आहेत. जर ब्लॉक डील अंतर्गत शेअर्स विकले गेले नाहीत तर बँका शेअर्सची ब्लॉक किंवा रिटेलच्या माध्यमातून विक्री करू शकतात. SBI शिवाय किंगफिशरला कर्ज देणार्या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, IDBI बँक, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक, फेडरल बँक आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे.
मल्ल्याच्या दाव्यापेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली
या प्रकरणात, फरारी विजय मल्ल्या याने गेल्या वेळी माध्यमांना दिलेल्या निवेदनात, असा दावा केला होता की, त्याने जे कर्ज घेतले त्यापेक्षा जास्त किमतीची संपत्ती जप्त केली गेली आहे. ट्वीटमध्ये मल्ल्या म्हणाला होता की, ‘टीव्ही पाहताना माझे नाव वारंवार घोटाळेबाज म्हणून सांगितले जात आहे. किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता ईडीने जप्त केली आहे, यावर कोणाचाही विश्वास नाही काय? मी अनेक वेळा असे म्हटले आहे की, मी कर्ज 100% परत देईन. याबाबतीत चीटिंग किंवा फ्रॉड कोठे आहे? ‘
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group