डिसेंबर महिन्यात तब्बल 18 दिवस बँका राहतील बंद; पहा सुट्ट्यांची यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सणामुळे यंदाचा नोव्हेंबर महिना अर्ध्याच्या वर सुट्ट्यांमध्ये गेला. त्यामुळे बँकांची अनेक कामे रखडली गेली आहेत. आता पुन्हा डिसेंबर महिन्यात बँकांना 18 दिवस सुट्टी असल्यामुळे नागरिकांची मोठी पंचायत होणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात राज्यांतील बँका 18 दिवस बंद रहातील. तसेच, 6 डिसेंबर रोजी बँक संघटनांनी संप पुकारला असल्यामुळे तेव्हा देखील बँकेला सुट्टी असेल. त्यामुळे तुम्हाला जर बँकेची काही महत्त्वाची कामे करायची असतील तर आताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी तपासा.

सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे:

1 डिसेंबर – यादिवशी राज्य उद्घाटन दिन असल्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधील बँकांना सुट्टी राहील.

4 डिसेंबर – गोव्यातील बँका सेंट फ्रान्सिस झेवियर या सणामुळे बंद राहतील.

9 डिसेंबर – दुसरा शनिवार आल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.

10 डिसेंबर – रविवार आल्याने बँका बंद राहतील.

12 डिसेंबर – मेघालयातील बँका पा-टोगन नेंगमिंजा संगमामुळे बंद राहणार आहेत.

13 डिसेंबर – सिक्कीममध्ये लोसुंग/नामसुंग असल्यामुळे बँकांना 13 आणि 14 डिसेंबरला सुट्टी असेल.

17 डिसेंबर – यादिवशी रविवार असल्यामुळे बँका सुट्टीवर असतील.

18 डिसेंबर – मेघालयमध्ये यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त बँकांना सुट्टी राहील.

19 डिसेंबर – यादिवशी गोवा मुक्ती दिन असल्यामुळे बँका बंद असतील.

23 डिसेंबर – चौथ्या शनिवारमुळे बँकाना सुट्टी असेल.

24 डिसेंबर – रविवार असल्याकारणाने बँका बंद राहतील.

25 डिसेंबर – ख्रिसमस सणामुळे देशभरातील बँका बंद असतील.

26 डिसेंबर – ख्रिसमसच्या निमित्ताने मिझोरम, नागालँड आणि मेघालयमधील सर्व बँका बंद राहतील.

27 डिसेंबर – नागालँडमध्ये ख्रिसमसनिमित्त बँकांना सुट्टी असेल.

30 डिसेंबर – मेघालयमध्ये यू किआंग नांगबाहनिम्मित बँकांना सुट्टी राहील.

31 डिसेंबर – यादिवशी रविवार आल्याने सर्व बँका बंद असतील.