‘या’ आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार, बँकेला भेट देण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट तपासा

Bank Holiday
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हांला या आठवड्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाचे काम करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, या आठवड्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही. एकूणच काय कि, या आठवड्यात बँका 4 दिवस बंद राहतील. म्हणून, बँकेला भेट देण्यापूर्वी आपल्या बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पाहणे फायदेशीर ठरेल. जेणेकरून तुम्ही अनावश्यक त्रास टाळू शकता. RBI ने म्हटले आहे की,” 20 आणि 21 सप्टेंबर रोजी बँका बंद राहतील. 8 सप्टेंबरपासून सलग 5 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे देशातील विविध राज्यांमध्ये बँका बंद होत्या. या महिन्यात बँका कधी आणि कोणत्या राज्यात बंद आहेत ते जाणून घ्या.

कोणत्या राज्यांमध्ये, बँकेला कधी सुट्टी असेल
RBI च्या मते, इंद्रजत्रेला 20 सप्टेंबर 2021 म्हणजेच सोमवारी गंगटोक बँकांमध्ये सुट्टी असेल. यानंतर, मंगळवार, 21 सप्टेंबर रोजी कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये श्री नारायण गुरु समाधी दिनाची सुट्टी असेल. अशा स्थितीत या राज्यांमध्ये या दिवसांमध्ये बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही. यानंतर, 25 सप्टेंबर 2021 रोजी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. त्यानंतर 26 सप्टेंबर 2021 रोजी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी देशभरात बँका बंद राहतील. RBI च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या लिस्टनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेच्या मते, या सुट्ट्यांमध्ये ऑनलाइन बँकिंगच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. जर तुम्हाला सोप्या शब्दात समजायचे झाले तर बँकेच्या ग्राहकांना डिजिटल बँकिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ते उर्वरित दिवसांप्रमाणे सुट्टीच्या दिवशीही ऑनलाइन बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात. विविध राज्यांच्या सण आणि समजुतीनुसार बँकांमध्ये सुट्ट्या असतात. त्याचबरोबर काही सण देशभरात एकाच वेळी साजरे केले जातात. अशा परिस्थितीत सर्व राज्यांमध्ये बँकांचे सामान्य कामकाज एकाच वेळी बंद राहते.