दिल्ली | संप आणि सुट्ट्या यांच्यामुळे पुढील आठवड्यात बँका केवळ तीनच दिवस सुरु राहणार आहेत. १० पीएसयू बँकांच्या चार मोठ्या बँकांमध्ये मेगा विलीनीकरणाच्या योजनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने (AIBEO) २ मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानेही सदर संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यात, सोमवारी आणि मंगळवारी बँका खुल्या राहतील परंतु गुढी पाडवा आणि तेलगू नववर्ष दिनाचा सण असल्यामुळे अनेक शहरांमध्ये बुधवारी बँक बंद राहतील. २५ मार्च रोजी वसंतोत्सवामुळे बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि नागपूर अशा अनेक शहरांतील बँका बंद राहतील. गुरुवारी, शुक्रवारी पुन्हा बँकांसाठी कामकाजाचा दिवस असेल. महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी सर्व अनुसूचित व्यावसायिक बँका बंद असल्याने शनिवारीही सुट्टी असेल.
वेतन संबंधित मुद्द्यांबाबत भारतीय बँक संघटना (आयबीए) शी मतभेद झाल्यानंतर बँक संघटनांनी ११ मार्चपासून ३ दिवसाच्या संपावर बसण्याची धमकी दिली होती परंतु नंतर ते रद्द करण्यात आले. १० पीएसयू बँकांची मेगा विलीनीकरण योजना १ एप्रिलपासून लागू होणार आहे. बँक संघटनांनी सरकारने विलीनीकरणाच्या योजनेस रोलबॅक करण्याची मागणी केली आहे. AIBEA चे सरचिटणीस सी.एच. वेंकटचलम म्हणाले की, दुर्दैव आहे की गेल्या तीन दशकांत, सलग सरकारे बँकांना खाजगी कॉर्पोरेट हक्कांच्या स्वाधीन करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक-क्षेत्रातील बँकिंग धोरणे अवलंबत आहेत.