आता ATM मध्ये कॅश संपली तर बँकांना भरावा लागणार दंड, हा नवीन नियम कधी लागू होणार ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन एक आदेश जारी केला आहे. ज्याअंतर्गत ATM मध्ये कॅश कमी झाल्यास RBI ने बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ATM मध्ये कॅश उपलब्ध नसल्याने लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी RBI ने बँकेने हे पाऊल उचलले आहे. RBI ने मंगळवारी याबाबतची माहिती दिली.

किती दंड असेल ते जाणून घ्या
RBI ने म्हटले आहे की, “या संदर्भात नियमाचे पालन न केल्यास ते गांभीर्याने घेतले जाईल आणि आर्थिक दंड आकारला जाईल. ATM मध्ये कॅश टाकली नाही तर 10,000 रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या दिवसापासून नवीन नियम लागू होतील
ही व्यवस्था 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. 1 ऑक्टोबर 2021 पासून जर बँकेच्या ATM मध्ये कॅश मिळाली नाही तर बँकांना दंड भरावा लागू शकतो. RBI ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, ATM मध्ये कॅश न टाकल्यास दंड आकारण्याचा हेतू हा लोकांच्या सोयीसाठी ATM मशीनमध्ये पुरेसे पैसे असल्याची खात्री करणे आहे.

RBI चे नवीन नियम काय आहेत ते जाणून घ्या
एका महिन्यात ATM मध्ये 10 तासांपेक्षा जास्त वेळ कॅश नसल्यास संबंधित बँकांना RBI हा दंड लावेल. ही व्यवस्था 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल. यासाठी RBI ने बँक/व्हाईट लेबल ATM ऑपरेटरला ATM मध्ये कॅशची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याची सिस्टीम मजबूत करण्यास सांगितले आहे. जून 2021 अखेर देशभरातील विविध बँकांमध्ये 2,13,766 ATM होते.

RBI ने म्हटले आहे की,”ATM मध्ये कॅश नसल्यास, सिस्टम जनरेटेड स्टेटमेंट द्यावे लागेल. हे स्टेटमेंट RBI च्या इश्यू डिपार्टमेंटला पाठवले जाईल ज्या अंतर्गत ATM येते. या नियमाचे पालन न केल्यास गंभीरपणे घेतले जाईल आणि आर्थिक दंड आकारला जाईल.”