दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे अर्ज भरणे आजपासून सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 11 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. या परीक्षेत श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर न करता पुरवणी परीक्षा लेखी स्वरूपात होईल, असे संकेत मंडळाने दिले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी बारावी 2021 च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकाल जाहीर करण्यात आला. निकालाला जुलै-ऑगस्ट उघडल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सोमवारी मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

विलंब शुल्कासह 19 ते 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दहावी बारावीचे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

www.mahahscboard.in या संकेतसथळावर अर्ज भरता येणार आहेत विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले असे वाटले तर असे विद्यार्थी श्रेणी सुधार योजने अंतर्गत सर्व विषय घेऊन पुन्हा परीक्षेला बसू शकतो. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन संधी असतात. मार्च 2020 मधील विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारायची दुसरी संधी असणार आहे अशी माहिती मिळत आहे.

Leave a Comment