सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊनमध्ये बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु राहणार : जिल्हाधिकारी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. 22 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशात बदल करत बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु राहणार असल्याचा सोमवारी 24 मे रोजी सायंकाळी आदेश दिला आहे.

जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 25 मे 2021 रोजीपासून 1 जून रोजीच्या सकाळी 7 पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी परवानगी दिल्याने लोकांची गैरसोय होणार नाही. तसेच बाजारपेठेतील तसेच जीवनाश्यक वस्तूंसाठी होणारी गैरसोय टाळली जाणार आहे. आज मध्यरात्रीपासून 1 जून सकाळ पर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये सहकारी बॅंका पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामध्ये आज बदल करण्यात आला असून आता बॅका 11 ते 1 या वेळेत सुरू राहणार आहेत.

Leave a Comment