Bansuri Swaraj : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज संसदेतील त्यांच्या तडफदार भाषणशैलीसाठी ओळखल्या जात होत्या. एकेकाळी संसदेत भाजपची बाजू घेत त्यांनी विरोधकांना अक्षरशः घायाळ केलं होते. मात्र २०१९ मध्ये कर्करोगाने सुषमा स्वराज यांचं निधन झालं. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज याना लोकसभेचे तिकीट दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या जागी बांसुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. आज आपण जाणून घेऊयात बांसुरी स्वराज नेमक्या कोण आहेत?
पेशाने वकील आहेत बांसुरी स्वराज – Bansuri Swaraj
जस आम्ही तुम्हाला सांगितलं, बन्सुरी स्वराज या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. 1982 मध्ये दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला. बन्सुरी स्वराज यांची 2007 मध्ये बार कौन्सिल ऑफ दिल्लीमध्ये नोंदणी झाली होती. बांसुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. यामध्ये त्यांना सुमारे दीड दशकाचा अनुभव आहे. त्यांनी वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीए (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. त्यानंतर बन्सुरी यांनी लंडनमधील प्रतिष्ठित बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्या कायद्यात बॅरिस्टर म्हणून पात्र झाल्या . त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर ऑफ स्टडीज पूर्ण केले.
आगामी लोकसभा चुनाव 2024 में नई दिल्ली लोकसभा सीट से भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी बनाए जाने पर आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, आदरणीय केंद्रीय गृहमंत्री श्री @AmitShah जी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी, आदरणीय राष्ट्रीय संगठन महामंत्री श्री @blsanthosh… pic.twitter.com/mkYDufDm9Y
— Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) March 2, 2024
बांसुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी करार, रिअल इस्टेट, कर, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद तसेच अनेक फौजदारी खटले चालवले आहेत. बांसुरी स्वराज यांची खाजगी प्रॅक्टिस चालवण्यासोबतच हरियाणा राज्यासाठी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या वर्षी भाजपने बन्सुरी स्वराज यांना दिल्ली राज्याच्या लॉ सेलचे राज्य सहसंयोजक बनवले होते. आता तर त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
भाजपचे तिकीट मिळाल्यानंतर बांसुरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज मला माझ्या आईची आठवण येत आहे, ती जिथे कुठे असेल तिथून मला आशीर्वाद देत असेल. माझ्या आईने केलेले भाकीत आज खरे ठरताना दिसत आहे की पंतप्रधान मोदी भाजपच्या जाहीरनाम्यात लिहिलेले प्रत्येक वचन पूर्ण करतील. मोदी सरकारच्या काळात गेल्या 10 वर्षात भारतात अभूतपूर्व विकास कामे झाली आहेत. 2014 पूर्वी जी अर्थव्यवस्था घसरत होती ती आम्ही मजबूत केली आहे. त्यामुळे याच विकासाच्या जोरावर जनता आम्हाला मतदान करेल, अशी प्रतिक्रिया बांसुरी स्वराज यांनी दिली