हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baradhara Waterfall) आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. त्यात पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच मान्सून पिकनिकचे वेध लागतात. शुभ्र धुकं, हिरवा निसर्ग आणि आल्हाददायी वातावरणात एक रिफ्रेश फिलिंग देतं. ज्यासाठी पावसाळ्यात एकतरी पिकनिक करायला हवीच. तुम्हीही जर पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बारामुखी धबधब्याला जरूर भेट द्या. हा धबधबा इतर कोणत्याही धबधब्यांपेक्षा वेगळा आणि अत्यंत नयनरम्य आहे. शिवाय या धबधब्याची खासियत म्हणजे, हा धबधबा १२ ठिकाणाहून वाहतो. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
कुठे आहे? (Baradhara Waterfall)
उत्तर महाराष्ट्रात खान्देशातील नंदुरबार येथे हा धबधबा आहे. ज्याचे नाव ‘बाराधरा धबधबा’ असे आहे. या धबधब्याचे रूप अत्यंत सुंदर आणि मोहक आहे खास करून पावसाळ्यात इथे फिरायला जाण्याची मजा काही औरच आहे. या धबधब्याचे रूप डोळ्यात साठवून घ्यावे इतके मनमोहक आहे. त्यामुळे इथे फिरायला गेले असता या धबधब्यात भिजण्याचा मोह टाळता येत नाही. मात्र महत्वाची बाब अशी की, धबधब्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात इथे जाणाऱ्या पर्यटकांना अनेकदा या धबधब्याचे रौद्र रूप दिसले आहे.
बाराधारा धबधब्याचे वैशिट्य
नंदुरबारमधील ‘बाराधारा’ या धबधब्याचे वैशिट्य महाजन याच्या नावातच त्याची खासियत दडली आहे. हा धबधबा आपल्या अनोख्या रुपामुळे सर्वाना आपल्याकडे आकर्षित करतो. (Baradhara Waterfall) एकाच डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा १२ ठिकाणावरून कोसळतो. उंचावरून पडणाऱ्या या बारा पाण्याच्या धारा थेट नर्मदा नदीला जाऊन मिळतात. संपूर्ण देशात हा एकमेव धबधबा आहे जो एकाच डोंगरावरून कोसळतो, पण १२ ठिकाणावरून. त्यामुळे हा धबधबा पहायला पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते.
पर्यटकांना घ्यावी लागते विशेष काळजी
बाराधारा धबधबा इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळा आणि सुंदर असला तरीही पावसाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पावसाच्या दिवसात हा धबधबा कधी रौद्ररूप धारण करतो ते कळत नाही. ज्यामुळे धबधब्यात पाण्याचा अंदाज लावता येत नाही. अशा काळात अनेक पर्यटकांचे मृत्यूदेखील झाले आहेत. (Baradhara Waterfall) त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी जातेवेळी पाण्याचा अंदाज घेऊन जा. अन्यथा, काय होऊ शकत याची कल्पनाही भयंकर आहे.