बारामतीच्या शेतकऱ्याने 2 महिन्यात 20 गुंठ्यांत काकडी लागवडीतून मिळवला 2 लाखांचा नफा

Cucumber Agriculture
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शेतकरी शेतीत अनेक प्रयोग करून पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये सध्या दिवस बदलत चाललेले आहेत. अनेक उच्चशिक्षित युवक नोकरी न करता वेगवेगळी पिके घेऊन चांगले उत्पादन कसे घेता येईल, तसेच नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घेता येईल हे पाहत आहेत. पुण्याजवळील बारामती तालुक्यामधील श्रीकांत काकडे या तरुणाने शेतीतुन अनेक पिके घेऊन चांगले उत्पन्न घेतले आहे. त्याने 2 महिन्यात 20 गुंठ्यांत काकडी लागवडीतून 2 लाखांचा नफा मिळवला आहे.

काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते. काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते. उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात काकडीची लागवड केली जाते.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात इतर पिके घेऊन त्यातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तसेच त्याची थेट विक्री करायची असेल तर चिंता Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतः अनेक पिकांची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

kakadi

बारामती तालुक्यातील निंबुत येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी श्रीकांत रामदास काकडे ( वय 26) यांनी जानेवारी महिन्यात आपल्या वीस गुंठे शेतजमिनीमध्ये चार फुटी पट्टा पद्धतीने व संपूर्ण मल्चिंग पेपर व ड्रिप इरिगेशन करून ‘सागर‘ या जातीच्या काकडीची लागवड केली. आणि त्यातून आज त्यांनी चागले उत्पन्न मिळवले आहे.

काकडी

अशा प्रकारे वाढवले उत्पन्न

श्रीकांत काकडे यांनी आपल्या वीस गुंठे शेतीच्या क्षेत्रात काकडीची लागवड केली. वास्तविक पाहता हे पीक 30 दिवसांत चालू होते. या पिकाला दोन ते 3 औषधाची फवारणी, दोन खुरपणी, तारकाटीच्या साहाय्याने वेल सुतळीने बांधले जाते. या सर्व गोष्टी श्रीकांत यांनी केल्या.

काकडी20 गुंठ्यांत घेतले 7 टन उत्पादन

साधारण वीस गुंठ्यांत कमीत कमी त्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये इतका खर्च आला. ढगाळ वातावरण व थंडीमुळे उत्पन्नात घट आली तरी श्रीकांत यांनी 20 गुंठ्यांत सात टन उत्पादन मिळवले. चालू बाजारभावाप्रमाणे सरासरी 28 रुपये किलोच्या आसपास काकडीला दर मिळाला असून वीस गुंठ्यांत दोन लाखांच्या आसपास नफा मिळाला आहे.

काकडी लागवड

60 दिवसांत 20 गुंठ्यांत 1 लाख 70 हजार नफा

श्रीकांत यांनी काकडी लागवड करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी काकडी पिकाबाबत पूर्ण माहिती घेतली. त्याच्या आधारावर त्यांनी संपूर्ण खर्च वजा जाता 20 गुंठ्यांत 1 लाख 70 हजार रुपये नफा मिळवला. 60 दिवसांच्या कालावधीत काकडीपासून निव्वळ नफा मिळवून श्रीकांत यांनी शेतीतून कमी कालावधीत कशा प्रकारे अनेक हंगामी पिके घेऊन झटपट पैसे मिळवता येतात हे दाखवून दिले.

papaya

पपईतूनही मिळवला लाखोंचा नफा

श्रीकांत यांना शेतीत हंगामी स्वरूपातील पिके घेण्याची सवय असल्याने त्यांनी यापूर्वीही पपई, आले अशी पिके घेतली आहे. त्यांनी यापूर्वी शेतीत पाच फुटी सरी काढून संपूर्ण क्षेत्र ड्रीप इरिगेशन करून दोन्ही बेडच्या मध्ये आंतरपीक म्हणून 15 नंबर या जातीच्या पपईची लागवड केली होती. पपई हे नऊ महिन्यांत चालू होणारे पीक आहे. तर, आले नऊ महिन्यांत काढणीस येते. आल्याचे एकरी उत्पादन 20 टनांपेक्षा अधिक निघाले. चालू बाजारभाव 40 ते 45 दर मिळाला तर एकरी 9 ते 10 लाखांच्या आसपास उत्पादन मिळाले. आणि पपईचे एकरी उत्पादन 60 ते 70 टनांच्या आसपास निघाले. चालू बाजारभाव 30 ते 40 रुपये किलोच्या आसपास मिळाला. एकरी उत्पादन 28 लाखांच्या आसपास मिळाले. आले व पपई या दोन्ही पिकांपासून एका वर्षामध्ये 37 लाखांच्या आसपास उत्पादन मिळाले.