हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगून आली.. तुतारी आली.. बारामतीत, आता सगळ्यांचा मनावरचं ओझं कमी झालंय.. काकाचा पक्ष फोडून, महायुती सोबत घरोबा केलेल्या अजितदादांचा, शरद पवारांनी (Sharad Pawar) ठरवून कार्यक्रम केलाय.. काकांचं वय जास्त झालंय म्हणून, त्यांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या पुतण्याला, म्हातारं किती खमकं हाय.. हे दाखवून दिलय.. बारामतीचा निकाल क्लिअर कट सांगतोय.. की साहेबांच्या नादी लागायचं नाय.. पण अजितदादांनी, मोदींपासून स्थानिक नेत्यांपर्यंत, सगळ्यांची ताकद लावूनही, सुनेत्रा वहिनींना निवडून का आणू शकले नाहीत?, बारामतीत तुतारीच का चालली?, हेच पाहूयात
अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपसोबत जाऊन , बारामतीत , सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली, आणि थेट सुप्रिया सुळेंना आव्हान दिले.. अजित पवारांनी साम, दाम, दंड, भेद वापरून, मतदारसंघातील सर्व बड्या नेत्यांना , आणि प्रमुख कार्यकर्त्यांना, आपल्याकडे वळवळ होते, त्यामुळे सुरुवातीपासूनच बारामतीत , सुप्रियाताई बॅकफूटवर दिसत होत्या.. मात्र शरद पवारांनी टॉप गिअर टाकत , सुप्रिया सुळेंसाठी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ, पिंजून काढला , आणि जुन्या जाणत्या नेत्यांच्या, गाठीभेटी घेत , बेरजेचे राजकारण केलं.. शरद पवारांनी अनंतराव थोपटे, चंद्रराव तावरे, सतीशराव काकडे, यांची भेट घेतली होती.. पवारांची हि शिष्ठायी, सुप्रिया सुळेंच्या कामी आली, असं बोललं पाहिजे..
दुसरा मुद्दा म्हणजे, नेतेमंडळी जरी दादांसोबत असली, तरी सर्वसामान्य मतदार मात्र , शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या मागे उभा राहिलेला दिसला.. खडकवासला या भाजपच्या बालेकिल्ल्यात, अवघे ५० टक्के मतदान झाल्याने, आधीच दादा गटात, अस्वस्थता निर्माण झाली होती.. भोर मधून, संग्राम थोपटे आणि पुरंदर मधून, संजय जगताप, यांनी सुप्रियताईंसाठी लावलेला जोर, फळाला आला.. तर दुसरीकडे, इंदापूरमधून दत्ता भरणे, आणि हर्षवर्धन पाटील, यांच्यासारखे दिग्गज नेते असूनही, ज्या एकगठ्ठा मताची अपेक्षा, अजितदादांना होती, ती एकगठ्ठा मते, सुनेत्रा पवारांना मिळाली नाहीत.. या नेत्यांनी , अजितदादांचा गेम केल्याची चर्चा, मतदारसंघात सुरु आहे..
शिवतारेंनी डाव साधला?
पुरंदरचे विजय शिवतारे, हे अजित पवारांचे, पारंपरिक विरोधक.. २०१९ च्या पराभवाचा बदला म्हणून, शिवतारे यांनी सुरुवातीला, बारामतीत अजित पवारांना विरोधकही केला.. अजित पवार विंचू आहे., त्याची दादागिरी खपवून घेणार नाही, पवारांच्या विरोधात, ५ लाख मते असून, त्या मतदारांना, मी न्याय देणार, अशा वलग्ना करणाऱ्या शिवतारेंनी, शिंदे – फडणवीसांच्या सांगण्यावरून, तलवार म्यांन केली खरी, आणि सूत्रेनं ताईंच्या प्रचारातही उतरले, मात्र शिवतारेंची हि भूमिका, पुरंदरमधील जनतेला पटल्याचे दिसत नाही… त्यामुळे पुरंदरमधूनही, सुप्रियाताईंच्या तुतारीने आघाडी घेतली.. हीच गोष्ट दौंड मध्ये पाहायला मिळाली.. पूर्वीपासूनच कट्टर विरोधक असलेल्या अजितदादांना, राहुल कुल यांच्या मतदारसंघातील जनतेनं नाकारत, सुप्रिया ताईंच्या पारड्यात भरगोस मतदान केलं..
आता खरा प्रश्न राहिला होता तो बारामतीचा.. सुरुवातीपासूनच, बारामतीचे राजकारण कोळून प्यायल्याने, याठिकाणी अजितदादाना मानणारा मोठा गट होता.. अनेक संस्थांवर दादांनी, आपल्या मर्जीतील माणसे पेरल्याने, सुप्रियाताई बारामती शहरात, पिछाडीवर जातील, असं सुरुवातीला बोललं जात होते.. मात्र अजितदादांच्या विरोधात, संपूर्ण पवार कुटुंबीय मैदानात उतरल्याने, दादा एकटेच एका साईडला पडले.. सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी, रोहित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, यांनी बारामतीत अक्षरशः रान उठवलं.. दादा एकीकडे ,आणि संपूर्ण कुटुंब एकीकडे असल्याने, जनतेमध्ये अजित पवारांबद्दल, वेगळं नॅरेटिव्ह तयार झालं.. अजित पवारांनी या वयात, शरद पवारांची साथ सोडायला नको होत , अशी भावना बारामतीकरांची झाली.. याचाच फटका , निवडणुकीत सुनेत्रा पवारांना होऊन , सुप्रिया सुळेंच्या पथ्यावर पडला.. साहेबांनी मोठ्या कष्टानं वाढवलेल्या घड्याळाचेच काटे, बारामतीत बंद करून, तुतारी वाजवण्याची वेळ, साहेबांवर आली.. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती..असं म्हणतात, तसं खरं ठरत, वयाचे 85 मध्येही, या तेल लावलेल्या पैलवानाने ,आपली ताकद दाखवून दिलीच..