हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Baramati Rain । बारामती तालुक्यात पावसाने हाहाकार केला आहे. दौंड, बारामती, नीरा भागात पावसाने अक्षरशः हौदोस घातलाय. धुव्वाधार पावसामुळे नीरा कालवा हा फुटलेला आहे. परिणामी या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांत पाणी शिरले असून NDRFची दोन पथकं परिसरात दाखल करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काटेवाडीतील नारोळी, कोरोळी येथील काही कुटुंबे तसेच बारामती शहरातील तीन धोकादायक इमारतीमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गापर्यंत- Baramati Rain
बारामती आणि दौंड भागात पावसाने चांगलंचं झोडपून काढलं आहे. बारामती (Baramati Rains), दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बारामती तालुक्यात कधी नव्हे इतका पाऊस कोसळला आहे. त्यातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गापर्यंत आले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती (Baramati Rain) निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे बारामतीमधील तीन इमारती खचल्या आहे. त्यामुळे रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. सुदैवानं यामध्ये कोणााचीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी जाऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला काही सूचना देखील केल्या. दौंड आणि बारामती परिसरात वर्षभरातील निम्मा पाऊस एकाच दिवसात पडला असं अजित पवारांनी म्हंटल. बारामती तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 14 इंच इतकी आहे. त्यापैकी 7 इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडल्याचे दादांनी सांगितलं. मी पुणे जिल्हाधिकारी आणि इतरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत असेही अजित पवारांनी म्हंटल.




