Batata Papad Recipe | मार्च महिना सुरू झालेला आहे. आणि उन्हाचा तडाका देखील चांगला जाणवायला लागलेला आहे. उन्हाळा सुरू होतात महिलावर्ग हे अनेक पदार्थ बनवायचे तयारीला लागतात. उन्हाळ्यामध्ये कुरडया, पापड्या, सांडगे, बटाटा, चकली यांसारख्या गोष्टी महिला घरी बनवत असतात. त्याचप्रमाणे अनेक महिला या नवनवीन पदार्थांचा शोध लावतात आणि त्यानुसार त्या दरवर्षी करून बघत असतात.परंतु आज आम्ही तुमच्यासाठी असेच एक वाळवणीचा चांगला पापडाचा पर्याय सांगणार आहोत. तुम्ही कधी साबुदाणा बटाटा पापड केलाय (Batata Papad Recipe) का हे पापड बनवायला देखील सोपे असतात आणि त्यासाठी अगदी कमी साहित्य लागते.
आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवतो. पळी पापड बनवतो किंवा इतर पापड देखील लाटताना ते फाटतात. परंतु तुम्हाला जर ही कोणती झंझट नको असेल तर तुम्ही एकदा साबुदाणा पापड नक्की करून बघा. उन्हात न वळवता अगदी कमी खर्चामध्ये हे पापड तयार होतात आणि चवीला देखील खूप चांगले लागतात.
साबुदाणा बटाट्याचे पापड करण्यासाठी लागणारे साहित्य
- उकडलेले बटाटे
- साबुदाण्याचे पीठ
- जिरे
- मीठ
- तेल
कृती | Batata Papad Recipe
सगळ्यात आधी तुम्हाला एका मोठ्या परातीमध्ये दोन उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहे. त्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये तुम्हाला एक कप साबुदाण्याचे पीठ घालायचे आहे. नंतर एक चमचा लाल तिखट, एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता तुम्ही हाताला थोडे तेल लावून हे सगळे साहित्य मिक्स करून घ्या. आणि त्याचा गोळा करून घ्या. जर तुम्हाला हे पीठ खूप पातळ वाटत असेल, तर तुम्ही त्यामध्ये थोडे आणखी साबुदाण्याचे पीठ घालू शकता.
यानंतर दोन प्लास्टिकचे पेपर घ्या आणि पेपरला हाताने तेल लावा एक प्लास्टिकचा पेपर उलट्या ताटावर ठेवा. आणि त्यावर छोटा गोळा ठेवून ठेवा आणि दुसरे प्लॅस्टिकचे पेपर गोळ्यावर ठेवून दुसऱ्या प्लेटनेत गोळ्यावर हलकासा दाब द्या. अशाप्रकारे न लाटता तुम्ही चांगले पापड करू शकता. तर तुम्ही दुसरीकडे फॅनखाली एक प्लास्टिकचा पेपर अंथरून ठेवा. त्यावर हे केलेले पापड वाळत घाला. त्याचप्रमाणे तुम्ही उन्हात देखील हे पापड वाढू शकता. दोन-तीन दिवसात हे पापड चांगल्या पद्धतीने त्यानंतर तुम्ही ते हवाबंद डब्यात ठेवून साठवून ठेवा. हे पापड महिनाभर टिकतात आणि हे पापड तुम्ही पाहिजे तेव्हा तेलात तळून खाऊ शकता.