हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला अपोलो रुग्णालयातुन अँजिओप्लास्टीनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच गांगुलीला पुन्हा एकदा छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर दादा पुन्हा एकदा ठणठणीत झाला आहे.
एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर गांगुलीला डॉक्टरांनी किमान 7 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. “गांगुलीची प्रकृती आता ठणठणीत आहे”, अशी माहिती डॉक्टर राणा दासगुप्ता यांनी दिली.
West Bengal: BCCI Chief Sourav Ganguly discharged from Apollo Hospital in Kolkata following angioplasty.
"He is absolutely right," says Dr Rana Dasgupta of Apollo Hospital. pic.twitter.com/YE9kf3BINA
— ANI (@ANI) January 31, 2021
आधी हृदयविकाराचा सौम्य झटका
दरम्यान गांगुलीला जानेवारी महिन्यात ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल केले गेले होते. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’