देशासाठी ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो ; गांगुलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

sauragv gagnguly
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाच्या आयपीएल (Indian Premier League)मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत जबरदस्त सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगितले होते. यावरुन नवा वादही निर्माण झाला होता.

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असून दिल्लीचा कर्णधार श्रेयसला मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्यावर परस्पर हितसंबंध राखल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता यावर जोरदार प्रत्युत्तर देत गांगुली यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे.

‘बीसीसीआय अध्यक्ष असताना गांगुली यांनी एका फ्रेंचाईजीच्या कर्णधाराची मदत कशी काय केली? असा थेट सवाल टीकाकारांनी गांगुलीला केला होता.  या टीकेचा खरपूस समाचार घेताना गांगुली यांनी आपल्या आक्रमक शैलीतून सर्वांना उत्तर दिले आहे. गांगुली म्हणाले की, ‘मी गेल्या वर्षी अय्यरची मदत केली होती. मी नक्कीच बोर्डचा अध्यक्ष असेल, पण एक गोष्ट विसरु नका की, मी भारतासाठी सुमारे ५०० सामने खेळलोय. त्यामुळे मी एका युवा खेळाडूशी नक्कीच बोलू शकतो आणि त्याची मदतही करु शकतो. मग तो श्रेयस अय्यर असो किंवा विराट कोहली. जर त्यांना मदतीची अपेक्षा असेल, तर मी मदत करु शकतो.’ असं गांगुली म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’