व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रोहितला नेमकं काय झालं?? दुखापतीबाबत BCCI ने दिले मोठं अपडेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडीज विरुद्धच्या T20 मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला. मात्र या विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला. कर्णधार रोहित शर्मा अवघे 5 चेंडू खेळून दुखापतीमुळे पॅव्हेलियन मध्ये परतला आणि भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र याबाबत बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.

फलंदाजी साठी उतरल्या नंतर अवघे 5 चेंडू खेळतात रोहितच्या कंबरेला त्रास झाला आणि मांसपेशी ताणल्या गेल्या. यामुळे त्याने मैदान सोडले. यानंतर याबाबत बीसीसीआयने अपडेट देत सांगितले की, रोहितला कंबरदुखीचा त्रास होत आहे. वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे.

दरम्यान, वेस्ट इंडीज विरुद्ध च्या 3 T20 सामन्यात भारताने 2-1 असा विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने हे लक्ष्य 19 षटकांत पार केल. सलामीवीर सूर्यकुमार यादवनं ४४ चेंडूंत ७६ धावांची आक्रमक खेळी करत भारताच्या विजयात मोठा हातभार लावला.