औरंगाबाद : सध्या रेल्वे पोलिसांकडून प्रवेशांसाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे. रेल्वेमध्ये बरेच लोक सिगारेट ओढतात. अनेकजण सिलिंडर, केरोसीन, पेट्रोल घेऊन जातात. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेतून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सिलिंडर घेऊन जाऊ नका, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटना देखील सर्वाधिक होतात. त्यामुळे आरपीएफ पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकावर आणि रेल्वेमध्ये प्रवाशांमध्ये जनजागृती अभियान सुरू केले आहे. यामध्ये आज (दि.२७) सकाळपासून पाच रेल्वेमध्ये जनजागृती करण्यात आली.
यामध्ये रेल्वेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना ज्वलंतशील पदार्थ घेऊन प्रवास करू नका असे आवाहन केले जात आहे. तसेच पेट्रोल, डिझेल, केरोसीन, गॅस सिलेंडर घेऊन प्रवास करू नका. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी जनजागृती आरपीएफच्या माध्यमातून केली जात आहे. सात दिवस ही जनजागृती केली जाणार असल्याचे आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवास करताना घ्या काळजी
आधीच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यात दुसरीकडे अनेक ठिकाणी आगीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे रेल्वेमध्ये सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. रेल्वेमध्ये अनेकजण सिगारेट ओढतात. त्यांच्यावर कारवाई देखिल केली जाते. मात्र सिगारेटमुळे देखील घटना घडू शकतात. त्यामुळे सिगारेट ओढू नये. अशी जनजागृती आरपीएफच्या वतीने करण्यात आली.
तसेच यावेळी सर्वांनी सुरक्षितता बालगुन प्रवास करावा असे आवाहन आरपीएफ निरीक्षक अरविंद शर्मा आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा