नवी दिल्ली वृत्तसंस्था : केवळ शहरातच नव्हे तर देशातील आणि राज्यांमधील खेड्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हा वेगानं फोफावताना दिसत आहे. अनेक राज्यांनी आणि जिल्ह्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनारुग्ण वाढीचा दर काही कमी येताना दिसत नाही. देशात मागील 24 तासात 4,01,107 तर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तसच देशात चार हजार 187 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात ३लाख १८ हजार ६०९ व्यक्ती कोरोनमुक्त झाले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India reports 4,01,078 new #COVID19 cases, 3,18,609 discharges, and 4,187 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,18,92,676
Total discharges: 1,79,30,960
Death toll: 2,38,270
Active cases: 37,23,446Total vaccination: 16,73,46,544 pic.twitter.com/QRK5bnwMkO
— ANI (@ANI) May 8, 2021
दरम्यान नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांची देशातील संख्या दोन कोटी 18 लाख 92 हजार 676 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण एक कोटी 79 लाख 30 हजार 960 व्यक्ती कोरोनातून पुर्णपणे बरी होऊन घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाख 38 हजार 270 इतकी झाली आहे. तर देशात सध्या 37,23,446 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
करुणाची साखळी तोडण्यासाठी आणि कोरोनाची लढण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण केले जात आहे. देशात आतापर्यंत 16 कोटी 73 लाख 46 हजार 544 व्यक्तींना कोरोनावरील लस टोचण्यात आली आहे याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे